शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपट्टीत दहा टक्के वाढ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 23:54 IST

शहरात आठ ते दहा दिवसांनंतर नागरिकांना पाणी देण्यात येत आहे. पाण्यासाठी दररोज नागरिक आंदोलने करीत आहेत. शहराच्या विविध भागात पाणी प्रश्न पेटलेला असताना महापालिका प्रशासनाने पाणीपट्टीत चक्क दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला.

ठळक मुद्देअंमलबजावणी सुरू : सर्वसाधारण सभेच्या ठरावाला प्रशासनाची बगल

औरंगाबाद : शहरात आठ ते दहा दिवसांनंतर नागरिकांना पाणी देण्यात येत आहे. पाण्यासाठी दररोज नागरिक आंदोलने करीत आहेत. शहराच्या विविध भागात पाणी प्रश्न पेटलेला असताना महापालिका प्रशासनाने पाणीपट्टीत चक्क दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणीही वॉर्ड कार्यालयांमार्फत सुरू करण्यात आली आहे. एकीकडे पाणी न देता पाणीपट्टीत करण्यात आलेली वाढ म्हणजे नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा प्रकार आहे.समांतर जलवाहिनी कंपनीसाठी महापालिकेने अगोदरच पाणीपट्टीत भरमसाठ वाढ करून ठेवली आहे. चार वर्षांपूर्वी मनपा फक्त १८०० रुपये पाणीपट्टी वसूल करीत होती. कंपनीसाठी ४ हजार ५० रुपये पाणीपट्टी करण्यात आली होती. दरवर्षी या पाणीपट्टीत दहा टक्के वाढ करण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. आज महापालिकेत खाजगी कंपनी अस्तित्वात नसली तरी कंपनीसोबत झालेल्या कराराची अंमलबजावणी प्रशासन आजही करीत आहे. मागील वर्षी मनपा प्रशासनाने पाणीपट्टीत दहा टक्के वाढीच्या हालचाली तीव्र केल्यानंतर सर्वसाधारण सभेत ठराव घेण्यात आला. एक रुपयाही यामध्ये वाढ करू नये, समांतरचे पाणी आल्याशिवाय पाणीपट्टीत वाढ करू नये, असेही सभेने प्रशासनाला बजावले होते. सर्वसाधारण सभेचा ठराव विखंडित करण्यासाठी शासनाकडे पाठवायला हवे होते. प्रशासनाने ठराव शासनाकडे न पाठविता थेट दहा टक्के पाणीपट्टीत वाढ केली आहे.कालपर्यंत मनपाच्या सर्व वॉर्ड कार्यालयांमध्ये ४ हजार ५० रुपये पाणीपट्टी स्वीकारली जात होती. आज अचानक ४४७७ रुपये मागितले जात आहेत. ज्या नागरिकाने वाढीव पैसे न दिल्यास त्याच्या नावावर थकबाकी दाखवून ४ हजार ५० रुपये स्वीकारण्यात येत आहेत. काही वॉर्ड अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रशासनाने आम्हाला दहा टक्के वाढीव पद्धतीने पाणीपट्टी वसूल करा, असे लेखी आदेश दिलेले आहेत. त्यामुळे आम्ही फक्त अंमलबजावणी करीत आहोत.वसुलीत विरोधाभासमनपाच्या वॉर्ड कार्यालयामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने पाणीपट्टी वसूल केली जात आहे. वॉर्ड अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, काहींनी पाणीपट्टीत वाढ करण्याचे आदेश अद्याप आलेले नाहीत, त्यामुळे गतवर्षीप्रमाणेच आकारणी सुरू आहे, असे सांगितले तर काहींनी ४४७७ रुपये पाणीपट्टी घेतली जात असल्याचे सांगितले. नागरिक जुन्याच पद्धतीने पाणीपट्टी भरत असतील तर उर्वरित रक्कम त्यांच्याकडे थकबाकी म्हणून दाखविली जात असल्याचे त्यांनी नमूद केले.१ रुपयाही वाढणार नाहीसर्वसाधारण सभा सर्वोच्च आहे. सभेने घेतलेला निर्णय म्हणजे ११५ नगरसेवकांनी घेतलेला असतो. पाणीपट्टीत एक रुपयाही वाढवू नये, असा ठराव सर्वसाधारण सभेत मंजूर झालेला आहे. यानंतरही प्रशासन १० टक्के वाढीव पद्धतीने पाणीपट्टी वसूल करीत असेल तर ते चुकीचे आहे. कारण प्रशासनाने सभेचा ठराव विखंडित करण्यासाठी शासनाकडे पाठविला नाही. नागरिकांवर एक रुपयाही बोजा पडू देणार नाही.नंदकुमार घोडेले, महापौर

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाwater scarcityपाणी टंचाई