शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
3
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
4
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
5
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
6
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
7
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
8
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
9
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
10
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
11
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
12
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
13
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
14
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
15
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
16
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
17
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
18
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
19
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
20
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'

जायकवाडी धरण असलेल्या पैठणमध्ये पाणीबाणी; तालुक्यातील २९ गावांत टँकरने पाणीपुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 19:33 IST

पाणीटंचाई असलेल्या २९ गावांमध्ये ३१ टँकरच्या ५४ खेपाद्वारे पाणीपुरवठा होत आहे

- संजय जाधवपैठण: सरासरीच्या पन्नास टक्क्यापेक्षा कमी पाऊस झाल्याने यंदा सप्टेंबर महिण्या पासूनच पैठण तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. सध्या २९ गावात ३१ टँकरने ५४ खेपा करून ५८०७६ ग्रामस्थांची तहान भागविली जात आहे.आणखी दहा गावांनी टँकरने पाणी पुरवठा करावा अशी मागणी केली असून टँकरने पाणी मागणाऱ्या गावाच्या संख्येत यापुढे वाढ होणार आहे. 

जानेवारी महिन्यानंतर तालुक्यात पाणीबाणीची परिस्थिती निर्माण होणार आहे. यंदा तालुक्यात जेमतेम सरासरी ३३८ मि मी पाऊस झाला. जोरदार पाऊस न झाल्याने नद्या नाल्यांना सुध्दा यंदा पाणी वाहिले नाही. यामुळे जमिनीतील पाणी पातळी खालावली असून अनेक गावातील पाणीपुरवठा करणाऱ्या विहीरींना पाणी कमी पडत आहे.यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे.

३१ टँकरने ५४ खेपातालुक्यातील पुढील गावात टँकरने पुरवठा करण्यात येत आहे. कंसात खेपाची संख्या. आडूळ - (१ खेप) आडूळ बु (३ खेपा), आंतरवाली खांडी (१), ब्राम्हणगाव तांडा (१), गेवराई मर्दा (१), गेवराई बु (१), गेवराई खु (१), अब्दुल्लापूर व होणबाची वाडी (१), एकतुणी (२), रजापूर (१), थापटी तांडा (१), आडगाव जावळे (१), कडेठाण (१), ब्राम्हणगाव (१), दाभरूळ (१), दरेगाव (१), देवगाव व देवगाव तांडा (१), डोणगाव (१), टेकडी तांडा (१), खादगाव (१), तुपेवाडी (१), तुपेवाडी तांडा (१), चिंचाळा (१), मीरखेडा (१), केकतजळगाव (२),  हार्षी (१) व चौंढाळा (१) या प्रमाणे पाणी पुरवठा सुरू असल्याचे विभाग प्रमुख राजेश कांबळे यांनी सांगितले.

खोडेगाव व मुधलवाडी येथे केंद्रऔद्योगिक वसाहतीतील खोडेगाव व मुधलवाडी येथील पाईपलाईनवर टँकर भरण्यासाठी केंद्र तयार करण्यात आले असून तीन खासगी विहीर अधिग्रहित करण्यात आल्या आहेत असे प्रभारी गटविकास अधिकारी उषा मोरे यांनी सांगितले.

तालुक्यातील जलसाठे निरंकपैठण तालुक्यातील जायकवाडी धरण वगळता इतर सर्व जलसाठे निरंक आहेत. यामुळे पैठण तालुक्यात आगामी काळात पाणीबाणीची परिस्थिती निर्माण होणार आहे. पैठण तालुक्यातील कचनेर, देवगाव, निलजगाव, दावरवाडी, ईनायतपूर, वरवंडी , गेवराई या पाझर तलावातील जलसाठा निरंक आहे.मध्यम व लघु प्रकल्प: खेर्डा- निरंक, शिवणी - १५%. गोदावरी वरील मोठे बंधारे:  आपेगाव - २०%, हिरडपुरी - १५% 

प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवूनतालुक्यातील जलस्त्रोताची परिस्थिती लक्षात घेता संभाव्य पाणीटंचाईचा आराखडा तयार करण्याचे आदेश पंचायत समिती प्रशासनास दिले आहेत.गावनिहाय परिस्थितीची नोंद आराखड्यात घेण्यात येणार आहे. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे- सोहम वायाळ, उपजिल्हाधिकारी, पैठण

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादWaterपाणी