शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

जायकवाडीतून उपसा घटल्याने शहरावर पाणीटंचाईचे ढग गडद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 19:22 IST

तीन दिवसांपासून दररोज १० एमएलडीने पाणी कमी 

ठळक मुद्देउन्हाळ्यातच जायकवाडीतील पाणी मृतसाठ्यापर्यंत पोहोचले होते.मनपाने धरणाच्या आत एक आपत्कालीन पाणीपुरवठा केंद्र उभारले आहे.

औरंगाबाद : जायकवाडी धरणातीलपाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने त्याचे गंभीर परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर होत आहेत. मागील तीन दिवसांमध्ये शहरात येणारे पाणी तब्बल १० एमएलडीने घटले आहे. शहरात फक्त ९० एमएलडी पाणी येत आहे. एवढ्या तुटपुंज्या पाण्यावर शहरातील लाखो नागरिकांची तहान कशी भागवावी, असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे. आज तातडीने धरणात महापालिकेची यंत्रसामुग्री पाठवून मनपाच्या अ‍ॅप्रोच चॅनलपर्यंत येणारे पाणी आणखी वाढविण्यासाठी खोदकाम करण्यात आले.

उन्हाळ्यातच जायकवाडीतील पाणी मृतसाठ्यापर्यंत पोहोचले होते. मागील काही दिवसांपासून मनपाच्या पाणीपुरवठा विभागाकडून २४ तास डोळ्यात तेल ओतून पाण्याचा उपसा करावा लागत होता. महापालिकेने भविष्यातील जलसंकट लक्षात घेऊन २०१३ मध्ये धरणात १० कोटी रुपये खर्च करून एक अ‍ॅप्रोच चॅनल तयार केला आहे. या चॅनलद्वारे मृतसाठ्यातील पाणी डाव्या कालव्यापर्यंत येत होते. मृतसाठाही कमी कमी होत असल्याने मनपाच्या अ‍ॅप्रोच चॅनलपर्यंत पाणीच येत नाही. शिवाय मनपाने धरणाच्या आत एक आपत्कालीन पाणीपुरवठा केंद्र उभारले आहे. या केंद्राच्या बाजूला ४५० मीटरची विहीरही तयार केली आहे. या विहिरीतही पाणी कमी येत आहे. सहा फ्लोटिंग पंपांद्वारे २४ तास गाळातून पाण्याचा उपसा सुरू आहे. पंप दर दोन ते तीन तासाला बंद पडत आहेत. पंपांत गवत, शेवाळ मोठ्या प्रमाणात येत आहे. मागील तीन दिवसांपासून मनपाला उपसा करण्यासाठी समाधानकारक पाणीच मिळत नाही. मनपाला १२० एमएलडीपेक्षा जास्त पाणी मिळायला तयार नाही.  

खोदकाम सुरूपाणीपुरवठ्याची ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता आज मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने युद्धपातळीवर सिंचन विभागाची परवानगी मिळवून धरणात चर खोदण्याचे काम सुरू केले. किमान १०० ते १२५ एमएलडी पाणी येथून मिळेल, यादृष्टीने मनपाचे प्रयत्न सुरू आहेत. यावेळी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, उपअभियंता बाबूराव घुले, किरण धांडे, बाविस्कर, एस. पी. गायकवाड आदींची उपस्थिती होती.

चार दिवसांआड पाणीपुंडलिकनगर, शिवाजीनगर, एसएफएस पाण्याच्या टाकीवरील वॉर्डांना तीन दिवसांआड पाणी देण्यात येत होते.  मनपाने  या भागातील पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे ढकलला . या भागात चार दिवसांआड म्हणजे पाचव्या दिवशी पाणी मिळेल. एन-५, एन-७ येथील दोन जलकुंभावरील २२ वॉर्डांना मागील काही महिन्यांपासून तब्बल आठ ते दहा दिवसांनंतर पाणीपुरवठा होत आहे. सिडको-हडको आणि चिकलठाणा भागाला पाचव्या दिवशी पाणी मिळेल.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाdroughtदुष्काळ