शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

मराठवाड्याचा पाणी प्रश्न म्हणजे आपली शेंडी दुसऱ्याच्या हातात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 13:18 IST

नीरा-भीमा स्थिरीकरणातून मराठवाड्याच्या वाट्याचे पाणी आणि कोकणचे पाणी मराठवाड्याकडे वळवता येईल का? अशी प्रसिद्ध जलतज्ज्ञ प्रा. प्रदीप पुरंदरे यांच्याशी साधलेला हा संवाद... 

- स.सो.खंडाळकर 

पाणी हा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा प्रश्न. त्यातल्या त्यात पाण्याच्या बाबतीत मराठवाडा आणि नगर-नाशिकचे भांडण दरवर्षी बघावयास मिळते. नीरा-भीमा स्थिरीकरणातून मराठवाड्याच्या वाट्याचे पाणी आणि कोकणचे पाणी मराठवाड्याकडे वळवता येईल का? अशी प्रसिद्ध जलतज्ज्ञ प्रा. प्रदीप पुरंदरे यांच्याशी साधलेला हा संवाद... 

प्रश्न : कृष्णा खोऱ्यातून किती पाणी मराठवाड्याला मिळू शकते?प्रा. पुरंदरे : सात टीएमसी पाणी मिळू शकेल. एकूण २५ टीएमसी पाणी मिळायला हवे. त्यापैकी सात टीएमसी पाण्यासाठी ५०० कोटी रु. खर्चही झाले आहेत; पण १८ टीएमसी पाणी मिळण्याची शक्यता कमी होत आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांनी कृष्णा खोऱ्यातून २५ टीएमसी पाणी मराठवाड्याला मिळावे यासाठी खूप प्रयत्न केले होते; पण नेहमीप्रमाणे नोकरशाही आडवी आली. त्यांनी यात खो घालून ठेवला. सात टीएमसी पाणी मराठवाड्याला मिळू शकेल, असे आता सांगता येऊ शकेल.

प्रश्न : यात काय राजकारण घडतेय..? प्रा. पुरंदरे : मोठे राजकारण घडतेय. विजयसिंह मोहिते पाटील हे आता भाजपमध्ये चालले आहेत. त्यामागे हे पाण्याचेच राजकारण आहे. नीरा-भीमा स्थिरीकरणातून एकूण ५६ टीएमसी पाणी उजनीला मिळायला हवे आणि त्यापैकी २५ टीएमसी पाणी कृष्णा खोऱ्याला मिळायला हवे. बारामतीच्या पाण्याचे प्रकरणही उद्भवलेय, ते यातूनच. 

प्रश्न : आणखी काय उपाययोजना करायला हव्यात? प्रा. पुरंदरे : मराठवाड्यातील कालव्यांची स्थिती वाईट आहे. मराठवाड्यातही समन्यायी पाणीवाटप व्हायला हवे.वैतरणेचे पाणी सध्या मुंबईला जाते. ते मराठवाड्याकडे वळवणे सहज शक्य नाही. त्यासाठी फार मोठे राजकीय प्रयत्न करावे लागतील, असा इशाराही ते आताच देऊन ठेवत आहेत. तांत्रिक दृष्टीने वैतरणेचे पाणी मराठवाड्याकडे वळवणे शक्यही आहे. पाटबंधारे महामंडळाच्या प्रस्तावानुसार प्रवाही पद्धतीने पाणी वळवता येऊ शकेल. 

कोकणचे पाणी वळवण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलीयजे लोक नाशिक-नगरमधून मराठवाड्याला पाणी मिळू देत नाहीत, ते लोक कोकणचे पाणी मराठवाड्याकडे वळू देतील काय? मला तरी कोकणचे पाणी मिळण्याची शक्यता तशी कमीच वाटते. वैतरणेतून ३९ टीमएसी पाण्यासाठी लिफ्ट करावे लागणार नाही; पण काही योजनांसाठी लिफ्ट करावे लागेल. मात्र, पर्यावरणवादी त्याला आक्षेप घेतील.

टॅग्स :WaterपाणीMarathwadaमराठवाडाState Governmentराज्य सरकारAurangabadऔरंगाबाद