शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
'पोलिसांनी त्याची हत्या केली...'! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
3
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
4
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
5
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
6
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
7
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
8
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
9
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
10
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
11
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
12
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
13
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
14
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
15
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
16
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
17
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
20
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन

गोदापात्रात सोडले जायकवाडी जलविद्युत निर्मिती केंद्रातून पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 1:37 AM

जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या जलविद्युत निर्मिती केंद्रातून सोमवारी गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. आपेगाव व हिरडपुरी या निम्न बंधाऱ्यांमध्ये हे पाणी साठवले जाणार आहे. त्यामुळे गोदाकाठच्या जवळपास १८ गावांचा पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न पावसाळ्यापर्यंत सुटणार आहे.

पैठण : जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या जलविद्युत निर्मिती केंद्रातून सोमवारी गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. आपेगाव व हिरडपुरी या निम्न बंधाऱ्यांमध्ये हे पाणी साठवले जाणार आहे. त्यामुळे गोदाकाठच्या जवळपास १८ गावांचा पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न पावसाळ्यापर्यंत सुटणार आहे.नाथसागराच्या विद्युत निर्मिती प्रकल्पातून (हॅड्रो) गोदावरी पात्रामध्ये सोमवारी सायंकाळी ५ वाजता पाणी सोडण्यात आले. तहसीलदार महेश सावंत यांच्या उपस्थितीत दगडी धरण अभियंता अशोक चव्हाण व ‘हॅड्रो’चे उपकार्यकारी अभियंता उमेश सोन्ने यांनी स्वयंचलीत यंत्राचे बटन दाबून प्रतिसेकंद १ हजार ६०० क्युसेक्स प्रमाणे पाणी सोडले. यावेळी आ. भुमरे यांचे स्वीय सहायक नामदेव खराद उपस्थित होते. एकूण १५ दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात येणार असून यात दोन्ही बंधारे पूर्ण क्षमतेने भरणार आहेत.पाणीटंचाई लक्षात घेता गोदावरी नदीच्या पात्रात जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यात यावे, यासाठी आ. संदीपान भुमरे यांनी जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. गोदावरीवर बांधलेला आपेगाव निम्नबंधारा ७.५० दशलक्ष घनमीटर जलसाठवण क्षमतेचा असून आजमितीस हा बंधारा कोरडाठाक पडलेला आहे. ८ दशलक्ष घनमीटर क्षमतेच्या हिरडपुरी बंधाºयानेही तळ गाठला आहे. सिंचनासाठी गोदावरी पात्रातून पाणी सोडण्यात येऊन आपेगाव व हिरडपुरी बंधारे भरण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. याबाबत १४ एप्रिल रोजी लोकमतने सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. पैठणपासून १४ किलोमीटर अंतरावर असलेला आपेगाव निम्नबंधारा व २१ किलोमीटरवरचा हिरडपुरी बंधारा या पाण्याने भरून घेतला जाणार आहे. जवळपास ३५ हजार लोकसंख्या असलेल्या या नदीकाठच्या परिसरातील हजारो जनावरांना याच लाभ मिळणार आहे. गेल्या १५ दिवसांपासून जायकवाडी धरणातून दोन्ही बंधाºयांमध्ये पाणी सोडण्याच्या मागणीने जोर धरला होता. त्याची दखल घेऊन पाणी सोडले आहे, असे भुमरे म्हणाले.गोदाकाठी सतर्कतेचा इशारानाथसागर जलाशयातून १५ दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग जलविद्युत निर्मिती केंद्राच्या आऊट लेटमधून करण्यात येणार आहे, असा संदेश देण्यात आला. सदरील पाणी हे आपेगाव-हिरडपुरी बंधाºयापर्यंत जाणार आहे. त्यामुळे सर्वांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.४या वेळेनंतर पाणी स्थिर होईपर्यंत कोणीही गोदावरी नदीपात्रात प्रवेश करू नये किंवा आपली जनावरे, मालमत्ता नदीपात्रात घेऊन जाऊ नये, आपापल्या जीविताचे व मालमत्तेचे स्वसंरक्षण करावे, असे आवाहन तहसीलदार महेश सावंत यांनी केले आहे.१४ गावे : गोदावरी नदीकाठावर १४ गावे असून यातील पैठण, पाटेगाव, वडवाळी, वाघाडी, नायगाव, मायगाव, आपेगाव, नवगाव, उंचेगाव, टाकळी अंबड, घेवरी, तळजापूर व हिरडपुरी आदी गावांना याचा लाभ होणार आहे. याशिवाय २० गावांना अप्रत्यक्ष लाभ होणार आहे.

टॅग्स :DamधरणelectricityवीजJayakwadi Damजायकवाडी धरणgodavariगोदावरी