शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
2
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
3
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
4
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
6
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
8
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
9
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
10
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
11
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
12
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
13
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
14
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
15
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
16
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
17
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
18
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
19
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

कचरा कोंडीची ‘वाट’चाल वर्षपूर्तीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 23:52 IST

शहरात दररोज जमा होणाऱ्या कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी राज्य शासनाने ९० कोटी रुपये दिले. या निधीतून महापालिकेला आजपर्यंत एकही प्रकल्प उभा करता आलेला नाही.

ठळक मुद्देसर्व निविदा पूर्ण : कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प अद्याप कागदावरच

औरंगाबाद : शहरात दररोज जमा होणाऱ्या कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी राज्य शासनाने ९० कोटी रुपये दिले. या निधीतून महापालिकेला आजपर्यंत एकही प्रकल्प उभा करता आलेला नाही. कचºयावर प्रक्रिया करणारे सर्व प्रकल्प कागदावरच आहेत. येणाºया काही महिन्यांमध्ये कचºयावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभे राहण्याची शक्यताही नाही. १६ फेब्रुवारी २०१९ रोजी शहरातील कचरा कोंडीला वर्षपूर्ती होत आहे, हे विशेष.शहरातील कचºयाची गंभीर अवस्था पाहून राज्य शासनाने क्षणार्धात महापालिकेला ९० कोटी रुपये दिले. या निधीतून पडेगाव, चिकलठाणा येथे प्रत्येकी १५० मेट्रिक टन क्षमतेचे दोन कचरा प्रक्रिया केंद्र उभारण्याची सूचना केली. महापालिकेने नियोजित केंद्राच्या शेड उभारणीची निविदा काढली. त्यानंतर वाळूज येथील एका कंपनीला प्रक्रिया करण्याचे काम देण्यात आले. मागील चार महिन्यांत चिकलठाण्यात शेडच उभे राहिले नाही. पडेगाव येथे काम सुरू करू नये म्हणून राज्य शासनातील एका मंत्र्यानेच स्थगिती आदेश दिला आहे. हर्सूल येथे अत्याधुनिक पद्धतीने कचºयावर प्रक्रिया करण्याचे काम नागपूर येथील कंपनीला दिले आहे. ही निविदा सध्या महापालिकेत वादात सापडली आहे. नक्षत्रवाडीत कचºयापासून गॅस निर्मिती करण्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. शहरातील संपूर्ण कचरा उचलण्याचे काम महापालिकेने बंगळुरू येथील कंपनीला दिले आहे. चार महिन्यांपूर्वी या कंपनीला काम दिले आहे. अद्यापपर्यंत कंपनीने एकही वाहन शहरात आणले नाही.‘अंदाज’पत्रक चुकीचेशहरात दररोज ४५० मेट्रिक टन कचरा जमा होतो. या कचºयावर शास्त्रोक्तपद्धतीने प्रक्रिया करण्यासाठी राज्य शासनाने इंदूरच्या ईको प्रो या प्रकल्प सल्लागार संस्थेची नेमणूक केली. या संस्थेने तयार केलेल्या अंदाजपत्रकानुसारच राज्य शासनाने निधी दिला. आता प्रत्यक्षात काम सुरू केल्यावर अंदाजपत्रकच चुकीचे तयार केल्याचे निदर्शनास येत आहे. कचरा प्रक्रिया केंद्राचे शेड उभारण्यासाठी २४ कोटी खर्च अपेक्षित धरण्यात आला. आता हे काम तब्बल ५४ कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे.प्रशासकीय इच्छाशक्तीचा अभावचिकलठाणा आणि हर्सूल येथे मागील तीन महिन्यांपासून शेड उभारणीचे काम सुरू आहे. शेड उभारणीत येणाºया छोट्या-मोठ्या अडचणी येत आहेत. या अडचणी दूर करण्यासाठी प्रशासन कुठेच कंत्राटदाराच्या पाठीशी उभे राहत नसल्याचे दिसून येते. शेड उभारणीच्या कामात अनेकदा अडथळा आणण्यात आला. प्रशासनाने कोणतीच कारवाई केली नाही.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न