शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

रस्त्यांवर विखुरलेला कचरा उचला; वर्गीकरण करण्याची सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 01:16 IST

: शहरातील प्रत्येक चौकात कचरा अस्ताव्यस्त पडलेला आहे. कचऱ्यामुळे अर्ध्यापेक्षा अधिक रस्ता व्यापला जात आहे. विखुरलेला सर्व कचरा उचलण्यात यावा. कच-याचे वर्गीकरण करून, नवीन कंपोस्ट पीटमध्ये टाकावा, सुका कचरा वेगळा करून ठेवावा, अशा सूचना सोमवारी रात्री सर्वसाधारण सभेत महापौर नंदकुमार घोडेले यांनी प्रशासनाला केल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील प्रत्येक चौकात कचरा अस्ताव्यस्त पडलेला आहे. कचऱ्यामुळे अर्ध्यापेक्षा अधिक रस्ता व्यापला जात आहे. विखुरलेला सर्व कचरा उचलण्यात यावा. कच-याचे वर्गीकरण करून, नवीन कंपोस्ट पीटमध्ये टाकावा, सुका कचरा वेगळा करून ठेवावा, अशा सूचना सोमवारी रात्री सर्वसाधारण सभेत महापौर नंदकुमार घोडेले यांनी प्रशासनाला केल्या. विशेष बाब म्हणजे कचरा प्रश्नावर चर्चा सुरू असताना सभागृहात बोटावर मोजण्याएवढेच सदस्य उपस्थित होते.शहरातील कचरा प्रश्नाचा सायंकाळी झोननिहाय आढावा घेण्यात आला. शहरात ठिकठिकाणी ओल्या कच-यावर प्रक्रिया करण्यासाठी पीट तयार करण्यात आले आहेत. या पीटचा वापर करावा, रस्त्यांवर कुठेच कचरा दिसून येऊ नये. सुका कचरा साठविण्यासाठी भाडेतत्त्वावर गोडावून घेण्याचे आदेशही सभेत देण्यात आले. हॉटेल आणि मंगल कार्यालयांना वारंवार सूचना देऊनही कचरा सार्वजनिक ठिकाणीच टाकण्यात येत आहे. हॉटेल व्यावसायिक, मंगल कार्यालयांना नोटिसा बजावण्याचे आदेशही महापौरांनी दिले. शहरात ४०० पेक्षा अधिक रसवंत्या सुरू आहेत. रसवंतीचालक रात्री उसाचे पाचट कचरा कुंड्यांवर आणून टाकत आहेत. त्यामुळे मनपाच्या घनकचरा विभागाला बराच त्रास सहन करावा लागत आहे. मनपाच्या रेकॉर्डवर फक्त ७६ रसवंतीचालकांनी परवानगी घेतली आहे. सर्व परवानग्या रद्द करण्याचे आदेश महापौरांनी मालमत्ता विभागाला दिले. सार्वजनिक ठिकाणी रसवंतीचा कचरा दिसून आल्यास परिसरातील रसवंतीचालकाला जबाबदार धरून दंड आकारण्यात यावा, असेही यावेळी बजावण्यात आले. महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाचे कनिष्ठ अभियंता धांडे यांना मनपाच्या सेवेत कायम करून घेण्याचा निर्णयही सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.मनपाची एनओसीचिकलठाणा एमआयडीसीमध्ये रस्ते, लाईट सुविधा देण्यासाठी एमआयडीसीने तयारी दर्शविली आहे. सर्वसाधारण सभेत मनपाची एनओसी देण्याचा ठराव घेण्यात आला.भाजप-एमआयएम वादभगवान शिक्षण प्रसारक मंडळाला भोगवटा प्रमाणपत्र दिल्याचा वाद आज सभेत एमआयएमने काढला. यावरून भाजप नगरसेवकांनी कडाडून विरोध केला. यासंदर्भात विधि सल्लागार अपर्णा थेटे यांनी प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे नमूद केले. न्यायालयात प्रकरण चालू असताना सर्वसाधारण सभेत चर्चा कशासाठी असा मुद्दा महापौरांनी उपस्थित करून चर्चेला पूर्णविराम दिला.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका