शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत विरोधाच्या ठिणगीनंतर कचऱ्याचा आगडोंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 00:16 IST

शहरात प्रक्रिया करण्यात आलेला कचरा हर्सूल सावंगी तलावाजवळ मागील दोन दिवसांपासून टाकण्यात येत आहे. शनिवारी सकाळी भाजप नगरसेवक पूनम बमणे यांच्यासह त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी कचरा टाकण्यास कडाडून विरोध केला. वाहनांवर दगडफेक, अधिका-यांना धक्काबुक्की करण्यापर्यंत त्यांची मजल गेली.

ठळक मुद्देकच-याची विल्हेवाट : हर्सूल येथे भाजप नगरसेवकाच्या समर्थकांकडून दगडफेक; अधिका-यांना धक्काबुक्की, तक्रार देण्यास टाळाटाळ

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरात प्रक्रिया करण्यात आलेला कचरा हर्सूल सावंगी तलावाजवळ मागील दोन दिवसांपासून टाकण्यात येत आहे. शनिवारी सकाळी भाजप नगरसेवक पूनम बमणे यांच्यासह त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी कचरा टाकण्यास कडाडून विरोध केला.वाहनांवर दगडफेक, अधिका-यांना धक्काबुक्की करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. विरोधाची ठिणगी पाडणा-यांवर गुन्हा दाखल करण्यास मनपा प्रशासनाकडून टाळाटाळ करण्यात येत आहे. सायंकाळी याच ठिकाणी मनपाने टाकलेल्या कच-याने पेट घेतल्याने परिसरात आगडोंब उसळला. मागील दोन महिन्यांपासून शहरात साचलेल्या कचºयावर केमिकल पद्धतीने प्रक्रिया करण्यात येत होती. या कचºयापासून खतनिर्मिती, स्क्रिनिंग करण्यासाठी चार जागांची निवड केली आहे. सर्वप्रथम झाल्टा येथे एक हजार टन कचरा टाकण्यात आला. गुरुवारपासून हर्सूल येथे कचरा टाकण्यात येतोय.शनिवारी सकाळी अचानक स्थानिक नगरसेवक पूनम बमणे यांनी कचरा टाकण्यास विरोध केला. ज्या ठिकाणी कचरा टाकण्यात येतोय, तेथून जवळच गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर आहे.पावसाळ्यात पाणी दूषित होईल, कचºयावर केमिकल फवारणी करण्यात येत आहे, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.बमणे यांनी अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, सहायक आयुक्त विक्रम मांडुरके यांच्यासोबत हुज्जत घालत धक्काबुक्कीही केली. नगरसेवक समर्थक रहिम पटेल यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी मनपाच्या वाहनांवर प्रचंड दगडफेक सुरू केली. वाढता विरोध लक्षात घेऊन २५ पेक्षा अधिक कचºयाची वाहने परत मध्यवर्ती जकात नाक्यावर आणण्यात आली.महापालिकेत नंतर बैठक घेण्यात आली. उपमहापौर विजय औताडे, पूनम बमणे यांनी कचरा टाकण्यास विरोध दर्शविला. महापौरांनी दोघांची समजूत घातली.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाagitationआंदोलन