शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

‘कोम्बिंग ऑपरेशन’मध्ये बजावले १४ आरोपींना ‘वॉरंट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 18:19 IST

बुधवारी रात्री केलेल्या कोम्बिंग आॅपरेशनमध्ये अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले.

औरंगाबाद : सतत पोलिसांना गुंगारा देणाऱ्या १४ आरोपींविरुद्ध शहर पोलिसांनी बुधवारी रात्री केलेल्या कोम्बिंग आॅपरेशनमध्ये अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले. तर तडीपार आणि पोलिसांच्या रेकॉर्डवरील २५ गुंडांची झाडाझडती घेतली. 

गुन्ह्यात न्यायालयाकडून सशर्त जामीन मिळाल्यानंतर न्यायालयीन कामकाजसमयी नियमितपणे न्यायालयात हजर राहण्याची जबाबदारी आरोपीची असते. मात्र, अनेक आरोपी असे असतात की, न्यायालयाने अनेकदा समन्स आणि वॉरंट बजावल्यानंतरही ते न्यायालयात येत नाहीत. अशा आरोपींविरोधात न्यायालयाकडून पकड वॉरंट जारी होते. त्यानंतरही ते सतत पोलिसांना चकमा देतात. असे सुमारे १४ आरोपी पोलिसांना सापडत नव्हते. त्यामुळे त्यांच्याविरोधातील वॉरंटची अंमलबजावणी पोलिसांना करता येत नव्हती. बुधवारी पोलिसांनी छावणी, एमआयडीसी वाळूज, दौलताबाद आणि वाळूज या चार ठाण्यांतर्गत  कोम्बिंग आॅपरेशन राबविले.  या आॅपरेशनदरम्यान १४ वाँटेड आरोपी पोलिसांच्या हाती लागले. त्यांच्याविरोधातील अजामीनपात्र वॉरंटची अंमलबजावणी करून गुरुवारी त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. 

यासोबतच पोलिसांच्या रेकॉर्डवरील २५ आरोपी घरीच आहेत का, याबाबतची शहानिशा पोलिसांनी केली. पोलीस उपायुक्त डॉ. निकेश खाटमोडे, सहायक आयुक्त डी. एन. मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक श्रीपाद परोपकारी, ज्ञानेश्वर साबळे, सतीश टाक आणि विवेक सराफ यांच्यासह १५० कर्मचाऱ्यांनी या आॅपरेशनमध्ये सहभाग नोंदविला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादArrestअटक