शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

औरंगजेब कबरीबाबत इशारा; मिलिंद एकबोटे आणि समर्थकांना छत्रपती संभाजीनगर जिल्हा बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 13:00 IST

अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने जिल्हाबंदी काढले आहेत.

छत्रपती संभाजीनगर: जिल्ह्यातील खुलताबाद येथील औरंगजेब कबर नष्ट करण्याचा इशारा माजी आमदार तथा धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठाणचे अध्यक्ष मिलिंद रमाकांत एकबोटे यांनी दिला आहे. याची गंभीर दखल प्रशासनाने घेतली असून माजी आमदार एकबोटे आणि त्यांच्या समर्थकांना १६ मार्च २०२५ ते ५ एप्रिल २०२५ पर्यंत जिल्हाबंदी करण्यात आली आहे. 

काही दिवसांपूर्वी "छावा' चित्रपट प्रदर्शित झालेला असून सदर चित्रपटामुळे मराठा समाज व हिंदू धर्मातील लोकांच्या औरंगजेबाच्या कबरीबाबत भावना तिव्र झालेल्या आहेत. त्याबाबत सोशल मिडीयावर देखील मोठ्या प्रमाणावर आक्रोश पहावयास मिळत आहे. तसेच दिनांक १७ मार्च पासून बजरंग दल व विश्व हिंदू परिषद संघटनेने औरंगजेब याची कबर हटवावी यासाठी राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिलेला आहे. यातच माजी आमदार मिलिंद एकबोटे यांनी देखील कबर नष्ट करण्याचा इशारा दिलेला आहे. दरम्यान, धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठाण, हिंदू एकता मोर्चा, समस्त हिंदू आघाडी, शिवप्रताप भुमी मुक्ती आंदोलन यांचेकडून दरवर्षी छत्रपती संभाजी महाराज यांना मानवंदना देण्यासाठी वढू- तुळापूर येथे संभाजी महाराज श्रद्धांजली यात्रा रॅली काढली जाते. तसेच संभाजी महाराज यांचे पुण्यतिथीनिमीत्त वढू-तुळापूर येथे हजारो कार्यकर्ते जमा होवून महाराजांना मानवंदना देतात. दरवर्षी प्रमाणे या वर्षीही २९ मार्च रोजी छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी निमित्त मोठ्या प्रमाणावर माजी आमदार मिलिंद एकबोटे व त्यांच्या संघटनेचे कार्यकर्ते, सदस्य व समर्थक लोक जमा होणार असून तेथून संभाजी महाराज यांना मानवंदना दिल्यानंतर ते खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाची कबर नष्ट करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती प्रशासनास मिळाली आहे. यावरून माजी आमदार एकबोटे आणि त्यांच्या समर्थकांना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रवेश करण्यास १६ मार्च २०२५ ते ५ एप्रिल २०२५ पर्यंत बंदी करण्यात आली आहे, असे आदेश अपर जिल्हाधिकारी विनोद खिराळकर यानी दिले आहेत. 

पोलिस अहवालात काय?पोलीस अधीक्षक, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांनी अहवालात नमूद केले आहे की, मिलिंद एकबोटे हे अत्यंत कडवट हिंदूत्ववादी कार्यकर्ते असून त्यांचेवर भिमा कोरेगाव दंगलीत सहभागी असल्याचा व इतर धर्मियांच्या, समाजाच्या धार्मिक भावना दुखावण्याबाबतचे गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी त्यांनी प्रतापगडावरिल अफजलखान कबर हटवण्यासाठी मोठे आंदोलन केले होते. त्यामुळे त्यांना मानणारा मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे. तसेच त्यांचे संघटनेचे अनेक सदस्य व सक्रीय कार्यकर्ते छत्रपती संभाजीनगर व आजूबाजूच्या जिल्ह्यात आहेत. गोपनिय माहितीनुसार जर सदर लोक तुळापूर वरून खुलताबाद येथे यायला निघाले तर हिंदूत्वावादी संघटनांचे अनेक सक्रीय सदस्य, कार्यकर्ते व कट्टर हिंदू लोक त्यांना मिळण्याची दाट शक्यता आहे. सध्या मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना चालू आहे. तसेच महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन देखील चालू असून सदर आंदोलनात काही अनुचित प्रकार घडल्यास त्याचे हिंसक पडसाद संपूर्ण महाराष्ट्र राज्यात उमटण्याची दाट शक्यता असल्याने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 163(1) अन्वये मिलिंद रमाकांत एकबोटे, माजी आमदार तथा अध्यक्ष "धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठाण", "हिंदू एकता मोर्चा", "समस्त हिंदू आघाडी", "शिवप्रताप भुमी मुक्ती आंदोलन" यांना व त्यांच्या समर्थकांना दिनांक १६ मार्च ते ५ एप्रिल दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्हा हद्दीमध्ये प्रवेश करण्याबाबत मनाई आदेश निर्गमित करण्याची विनंती अहवालातून करण्यात आली. त्यानुसार अपर जिल्हाधिकारी खिराळकर यांनी जिल्हाबंदी आदेश काढले आहेत.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरMilind Ekboteमिलिंद एकबोटे