शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद शाळेच्या भिंतींवर बागडू लागली वारली चित्रकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 20:20 IST

 जि. प. प्रशाला गणोरी येथे राबविला अनोखा उपक्रम

- रुचिका पालोदकर । 

औरंगाबाद : शाळेमुळे जसे ज्ञान मिळते, तशीच जीवनाकडे कलात्मक भूमिकेतून पाहण्याची दृष्टीही तयार होते. आपले ज्ञान मंदिर सुशोभीत करण्यासाठी आणि मुलांना पारंपरिक कला शिकण्याचा आनंद मिळवून देण्यासाठी कला शिक्षिका भारती ठाकरे यांनी गणोरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत एक अभिनव उपक्रम राबविला आणि अवघ्या शाळेच्या भिंतींवरच वारली चित्रकलेतील आकृत्या फेर धरून बागडू लागल्या. 

जिल्हा परिषदेच्या शाळेतर्फे राबविण्यात आलेला हा उपक्रम सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. उन्हाळ्याच्या सुट्या असल्यामुळे सध्या मुलांक डे त्यांचे कलागुण जोपासण्यासाठी खूप वेळ आहे. हा वेळ सत्कारणी लावण्यासाठी एप्रिल महिन्याच्या अखेरीस ठाकरे यांनी चित्रकलेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना सोबत घेतले, त्यांना वारली चित्रकला शिकवली, त्यांच्याकडून सराव करून घेतला आणि मग भिंतींवर वारली चित्रकला रेखाटण्याचे काम सुरू केले. जवळपास १५ दिवसांत त्यांनी शाळेच्या संपूर्ण आवारात चार- चार फूट भिंतींपर्यंत वारली चित्रकला रेखाटली आहे. 

एप्रिल महिन्याच्या अखेरीस विद्यार्थी आणि शिक्षकांनी मिळून या कामाला सुरुवात केली. सकाळी ९ ते सायं. ५ अशी अखंडपणे ही मंडळी चित्रकलेत गढून गेलेली असायची. सुप्रिया शेळके, पायल पुसे, मोनिका पेहेरकर, भारती सपकाळ, प्राची गायकवाड, काजल सपकाळ, अश्विनी सपकाळ, कीर्ती चव्हाण, रूद्र सपकाळ, श्याम पुसे, कुचे या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी होऊन शाळा सुशोभीत केली. 

वारलीतून रेखाटणार शैक्षणिक आकृत्या नव्या पिढीची आपल्या संस्कृतीसोबतची नाळ अधिक मजबूत करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे. याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला. वारली चित्रकला ही महाराष्ट्रातील कोकण विभागातील आदिवासी जमातीची वैशिष्ट्यपूर्ण चित्र शैली आहे. गेरूची पार्श्वभूमी असलेल्या भिंतींवर तांदळाच्या पीठाने साधे व सुबक आकार रंगविणे, हे या चित्रशैलीचे वैशिष्ट्य समजले जाते. ही पारंपरिक कला आदिवासींपुरती मर्यादित न राहता यातून कलावंत घडावेत आणि येणाऱ्या पिढ्यांना ही पारंपरिक कला समजावी, हा आमच्या शाळेचा प्रयत्न आहे. इतिहासातील घटना, भौमितिक आकृत्या, वैज्ञानिक रचना आदी प्रकारची शैक्षणिक वारली चित्रे विद्यार्थ्यांच्या मदतीने यापुढे चितारण्याचा मानस आहे.- भारती ठाकरे,कला शिक्षिका 

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाTeacherशिक्षकStudentविद्यार्थीAurangabadऔरंगाबाद