शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

दिंडीसोबत डोक्यावर औषधे घेऊन आरोग्य कर्मचाऱ्यांची वारी; नेमणुकीचा आनंद पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 18:36 IST

‘तुम्ही कसेही जा, पण गरज पडल्यास वारकऱ्यांवर प्रथमाेपचार करा.'

औरंगाबाद : आषाढी एकादशीनिमित्त जिल्ह्यातून पंढरपूरला पायी जाणाऱ्या २४ दिंड्यांसोबत जिल्हा परिषदेचे आरोग्य सेवक डोक्यावर औषधांचे गाठोडे आणि दैनंदिन वापराचे कपडे घेऊन गुरुवारी वारीला निघाल्याचे पाहायला मिळाले.

आरोग्य विभागाने औषधे नेण्यासाठी वाहनाची व्यवस्था न केल्याने या आरोग्य कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. औरंगाबाद जिल्ह्यातील विविध संत, महंताच्या २४ दिंड्या वारीला निघाल्या आहेत. या दिंड्यांतील वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रत्येक दिंडीसोबत एक आरोग्यसेवक नियुक्त करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला. विविध प्रकारची औषधे देण्यात आली. या औषधांच्या साठ्यासह खाद्यपदार्थ आणि दैनंदिन वापराचे कपडेही नेणे आवश्यक असते, हे लक्षात घेऊन या कर्मचाऱ्यांनी ही औषधे कशी घेऊन जावीत, याची व्यवस्था प्रशासनाने केली नाही. 

आतापासून १२ जुलैपर्यंत कर्मचाऱ्यांना वारीत राहावे लागणार आहे. सध्या पावसाळ्याचे वातावरण असल्याने औषधे पावसात भिजू शकतात. मात्र आरोग्य विभागाने वाहन देण्यासाठी निधीची तरतूद नसल्याचे स्पष्ट करीत ‘तुम्ही कसेही जा, पण गरज पडल्यास वारकऱ्यांवर प्रथमाेपचार करा. १०८ रुग्णवाहिकेची मदत घ्या, तेथील जवळच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना कळवा,’ असे सांगून त्यांना रवाना केले.

नेमणुकीचा आनंद; पण...दिंडीसोबत पायी निघालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, दिंडीसोबत वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रशासनाने आमची नेमणूक केली, याचा आनंद आहे. मात्र आमचे वय ५०च्या आसपास आहे. औषधांचे गाठोडे डोक्यावर घेऊन आम्ही अन्य वारकऱ्यांप्रमाणे रोज चालू शकत नाही. शिवाय पावसाळा असल्याने औषधे भिजू शकतात. गर्दीत औषधांचा बॉक्स पडू शकतो, याचा विचार प्रशासनाने केला नाही. 

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022