शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग रचनेचा आराखडा अखेर जाहीर; तपशील जाणून घेण्यासाठी उमेदवारांसह नागरिकांत उत्साह

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 15:15 IST

सूचना आणि हरकती घेण्यासाठी १६ जूनपर्यंत अवधी

औरंगाबाद : महापालिकेच्या सातव्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग रचनेचा आराखडा व प्रभागांच्या हद्दींचा नकाशा महापालिकेतर्फे गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आला. आराखडा आणि नकाशावर नागरिकांना सूचना आणि हरकती घेण्यासाठी १६ जूनपर्यंत अवधी दिला आहे. आराखडा प्रसिद्ध होताच महापालिका मुख्यालयात इच्छुक उमेदवारांसह नागरिकांनी गर्दी केली होती.

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार गुरुवारी मनपाने प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा आणि प्रभागांच्या हद्दींचा नकाशा प्रसिद्ध केला. महापालिकेच्या मुख्यालयात अतिरिक्त आयुक्त बी.बी. नेमाने, निवडणूक विभागाचे प्रमुख तथा उपायुक्त डॉ. संतोष टेंगळे यांनी सूचना फलकावर आराखडा आणि नकाशा लावला. त्याशिवाय पालिकेच्या टप्पा क्रमांक तीन इमारतीच्या प्रवेशद्वारावरदेखील तो लावण्यात आला.

आराखड्यासंदर्भात अधिक माहिती देताना उपायुक्त तथा निवडणूक विभागप्रमुख डॉ. संतोष टेंगळे म्हणाले, महापालिकेने २७ मे २०२२ रोजी राज्य निवडणूक आयोगाकडे प्रारूप आराखडा सादर केला होता, त्याला आयोगाने मान्यता दिली. आयोगाच्या आदेशानुसार प्रभागांचा प्रारूप आराखडा आणि हद्दींचा नकाशा प्रसिद्ध करण्यात आला. प्रसिद्ध करण्यात आलेल्या आराखडा व नकाशावर सूचना- हरकती घेण्यासाठी आयोगाने वेळापत्रक ठरवून दिले आहे. त्यानुसार २ ते १६ जूनदरम्यान या अधिसूचनेवर नागरिकांना हरकती- सूचना घेता येतील. 

महापालिकेच्या निवडणूक विभागात त्या स्वीकारल्या जाणार आहेत. प्राप्त झालेल्या हरकती-सूचनांचे विवरण पत्र १७ जूनला राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केले जाणार आहे. निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यामार्फत २४ जूनला हरकती व सूचनांवर सुनावणी होईल. सुनावणीनंतर प्राधिकृत अधिकाऱ्यांनी केलेल्या शिफारशी ३० जूनपर्यंत राज्य निवडणूक आयोगास पाठवल्या जातील. प्रभाग रचनेचा नकाशा, हद्दी, व्याप्ती व वर्णन याचे नकाशे सर्व झोन कार्यालये व महापालिकेच्या संकेतस्थळावर नागरिकांना माहितीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे डॉ. टेंगळे यांनी सांगितले.

नवीन प्रभाग रचनेचा तपशील : - सदस्यसंख्या (वॉर्डांची संख्या) – १२६- प्रभागांची संख्या – ४२- लोकसंख्या – १२,२८,०३२- अनुसूचित जाती प्रवर्गाची लोकसंख्या – २,३८,१०५- अनुसूचित जमाती प्रवर्गाची लोकसंख्या – १६,३२०- एका प्रभागाची सरासरी लोकसंख्या – २९,२३९- अनुसूचित जातीं प्रवर्गासाठी आरक्षित वॉर्ड – २४- अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित वॉर्ड – १२- अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षित वॉर्ड – ०२- अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित वॉर्ड – ०१- एकूण सदस्यसंख्येच्या (वॉर्डांच्या) प्रमाणात महिलांसाठी आरक्षण – ६३- सर्वसाधारण प्रवर्गासाठीचे वॉर्ड – १००- सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित वॉर्ड – ५०

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका