शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मूल दत्तक घ्यायचंय; कशी कराल ऑनलाइन नोंदणी ?

By प्रशांत तेलवाडकर | Updated: November 17, 2023 20:04 IST

मूल दत्तक घेण्यासाठी इच्छुक पालकांची मोठी प्रतीक्षा यादी तयार झाली आहे.

छत्रपती संभाजीनगर : लग्न होऊन ३ ते ५ वर्षे झाली, पण घरात पाळणा हलला नाही. अशा वेळेस मूल दत्तक घेण्याची चर्चा सुरू होते. मात्र, मूल कसे, कुठून दत्तक घ्यायचे, यासाठी कोणती संस्था कार्य करीत असते का, ही प्रक्रिया कशी पार पाडली जाते, याची माहिती त्या दाम्पत्यांना नसते. यासंदर्भात तुम्ही ऑनलाइन माहिती जाणून घेऊ शकतात. किंवा महिला व बालविकास अधिकारी, बालकल्याण मंडळ अथवा शहरातील अनाथालय असो वा प्रसूतिगृहात याची सविस्तर माहिती मिळू शकते.

ऑनलाइन नोंदणी कोठे कराल?मूल दत्तक घेण्याचा दाम्पत्यांचा विचार पक्का करणे आवश्यक आहे. या दत्तकइच्छुक पालकाने त्यानंतर www.cara.wcd.gov.in या वेबसाइटवर नोंदणी करावी. अर्ज व त्यासोबत लागणारी कागदपत्रे अपलोड करावी लागतात.

कागदपत्रे कोणती लागतातवेबसाइटवर नोंदणी केल्यानंतर लागणारी कागदपत्रे पुढीलप्रमाणे- त्यांचा वयाचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, त्यांचे फोटो, त्यांचे आधारकार्ड व पॅनकार्ड व ते ज्या शहरात राहतात तेथील जवळील कायदेशीररीत्या दत्तक विधान पूर्ण करणाऱ्या संस्थेचे नाव अपलोड करावे लागते. त्यानंतर नावनोंदणी होते.

दत्तक विधान संस्था कशी करते काम?कायदेशीररीत्या दत्तक विधान करणारी संस्था निवडल्यानंतर ती संस्था मूल दत्तक देण्यासंदर्भात पुढील कार्य सुरू करते. संस्थेतील सामाजिक कार्यकर्ते त्या मूल दत्तक इच्छुक पालकांच्या घरी भेट देते. त्या दाम्पत्यांचे कौन्सिलिंग करतात. त्यानंतर एक अहवाल तयार केला जातो. त्यात काय आढळून आले व त्या दाम्पत्यांना मूल दत्तक द्यायचे की नाही, हे त्या अहवालात नमूद केले जाते. मूल दत्तक घेण्यासाठी ते दाम्पत्य पात्र असेल तर त्याचा अहवाल जिल्हा परिवेक्षा अधिकाऱ्यांकडे पाठविला जातो. ते अहवाल वाचून सही करतात व तो अहवाल नंतर बेवसाइटवर अपलोड करतात. मग ते दाम्पत्य तिथे मूल दत्तक मिळेपर्यंत प्रतीक्षा यादीत असते.

किती काळ करावी लागते वेटिंग?मूल दत्तक घेण्यासाठी इच्छुक पालकांची मोठी प्रतीक्षा यादी तयार झाली आहे. साधारण: नोंदणीपासून साडेतीन ते चार वर्षे पालकांना प्रतीक्षा करावी लागत आहे.

दाम्पत्यांना कोणत्या वयाचे मूल द्यायचे हे कसे ठरते?दाम्पत्यांच्या दोघांच्या वयाची बेरीज करून त्यानुसार त्या दाम्पत्यांना किती वर्षे वयाचे मूल दत्तक द्यायचे हे ठरविले जाते. यात दाम्पत्यांच्या दोघांच्या वयाची बेरीज ९० वर्षांच्या आत असेल तर त्यांना तीन महिन्यापासून ते दोन वर्षे वयाचे बाळ दत्तक दिले जाते. जर दोघांच्या वयाची बेरीज ११० पेक्षा अधिक असेल तर त्यांना १८ वर्ष वयापर्यंतचा मुलगा-मुलगी दत्तक घेता येऊ शकेल.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादFamilyपरिवार