शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

मोफत उपचार पाहिजे? मग रेशनकार्डच आणा; कागदपत्रे गोळा करण्यात लांबतो उपचार

By संतोष हिरेमठ | Updated: December 26, 2024 12:20 IST

आरोग्याचे कार्ड कशासाठी? ‘आयुष्मान कार्ड’चा उपयोग काय? रुग्णांचा सवाल

छत्रपती संभाजीनगर : एकत्रित प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गंत मोफत उपचार घेता येतात. त्यासाठी आयुष्मान कार्ड किंवा वैध फोटो ओळखपत्रासह संबंधित शिधापत्रिका, अन्य कागदपत्रे लागतात; मात्र, काही रुग्णालयांमध्ये आयुष्मान कार्ड नाकारून रेशनकार्ड, नाही तर तहसीलदार प्रमाणपत्र आणण्याची सक्तीच रुग्णांना केली जात असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या ‘रिॲलिटी चेक’मधून समोर आले.

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत प्रतिवर्ष प्रतिकुटुंब ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार महाराष्ट्र व देशातील इतर राज्यांमध्ये योजनेशी संलग्नित सरकारी किंवा खासगी रुग्णालयांत केले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आयुष्मान कार्ड किंवा शिधापत्रिका, तसेच अन्य काही कागदपत्रे असणे आवश्यक आहे. आयुष्मान कार्ड असणाऱ्यांना शिधापत्रिका व अन्य कागदपत्रे देण्याची आवश्यकता नाही. मात्र, तरीही आयुष्मान कार्ड नाकारून अन्य कागदपत्रांची काही रुग्णालयांत सक्ती केली जात आहे.

काय अनुभव आला रुग्णालयांत?केस-१पदमपुरा परिसरातील एका रुग्णालयात योजनेच्या कक्षातील आरोग्य मित्राला उपचारासंदर्भातील कागदपत्रे देण्यात आली. सोबत आयुष्मान कार्ड असल्याचे सांगितले. तेव्हा आयुष्मान कार्ड चालणार नाही. रेशनकार्ड किंवा तहसीलदार प्रमाणपत्र लागेल, असे सांगण्यात आले.

केस-२शहरातील बुढीलेन परिसरातील रुग्णालयात उपचारासाठी योजनेच्या कक्षातील आरोग्य मित्राकडे आयुष्मान कार्ड देण्यात आले. तेव्हा आयुष्मान कार्ड चालणार नाही. रेशनकार्ड लागेल, असे सांगण्यात आले. रेशनकार्ड देण्यात आले. तेव्हा यात नाव चुकीचे आले असून, तहसीलदार प्रमाणपत्र आणण्याची सूचना करण्यात आली.

केस-३जिल्हा सत्र न्यायालय परिसरातील रुग्णालयातील योजनेच्या कक्षात मोफत उपचारासंदर्भात आवश्यक कागदपत्रांची माहिती विचारण्यात आली. तेव्हा आयुष्मान कार्ड, रेशनकार्ड अथवा तहसीलदार प्रमाणपत्र लागेल, असे सांगण्यात आले.

जिल्ह्यात योजनेशी संलग्नित रुग्णालयांची संख्या-५४

तक्रार करावीयोजनेअंतर्गंत उपचार घेण्यासंदर्भात गाइडलाइन देण्यात आलेल्या आहेत. रुग्णांची काही तक्रार असल्यास त्यांनी तक्रार करावी.- डाॅ. रामेश्वर कुंभार, जनरल मॅनेजर ऑपरेशन्स, ‘एमजेपीजेएवाय’

योजनेसाठी लाभार्थी... गट अ : पिवळी, अन्नपूर्णा अन्नयोजना आणि केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबे. गट ब : शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंबे (शासकीय, निमशासकीय कर्मचारी यासह). कोणत्याही प्रकारची शिधापत्रिकाधारक नसलेली कुटुंबे.गट क : शासकीय अथवा शासनमान्य आश्रमशाळेतील विद्यार्थी, शासकीय किंवा शासनमान्य अनाथ आश्रमातील मुले, महिला आश्रमातील महिला, वृद्धाश्रमातील ज्येष्ठ, पत्रकार व त्यांच्यावर अवलंबून असलेली कुटुंबे, बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणीकृत, महाराष्ट्र राज्याबाहेरील रहिवासी असलेले बांधकाम कामगार व त्यांचे कुटुंब. गट ड : महाराष्ट्र सीमा भागातील रस्ते अपघातात जखमी झालेले, महाराष्ट्राबाहेरील व देशाबाहेरील रुग्णांना आरोग्य संरक्षण हे प्रतिरुग्ण प्रतिअपघात एक लाख एवढे राहील व १८४ उपचार लागू राहतील.गट इ : महाराष्ट्र, कर्नाटक सीमा भागातील, कर्नाटक राज्यातील मराठी भाषिक ८६५ गावांतील अन्नपूर्णा अन्न योजना, अंत्योदय, अन्न योजना शिधापत्रिकाधारक.

उपचार घेण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक? ‘गट अ’ ते ‘गट क’पर्यंतच्या लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड किंवा वैध फोटो ओळखपत्रासह संबंधित शिधापत्रिका, शुभ्र शिधापत्रिका नसल्यास, स्वयं-घोषणापत्रासह अधिवास प्रमाणपत्र किंवा तहसीलदार प्रमाणपत्र आणि वैध फोटो ओळखपत्र, शासकीय/निमशासकीय कर्मचारी असल्यास, स्वयं-घोषणापत्रासह शुभ्र शिधापत्रिका आणि वैध फोटो ओळखपत्र, संबंधित संस्थेने निर्गमित केलेले वैध ओळखपत्र आणि वैध फोटो ओळखपत्र देणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात अनेक ठिकाणी आयुष्मान कार्ड असल्यानंतरही शिधापत्रिका, तहसीलदार प्रमाणपत्राची सक्ती केली जाते.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरHealthआरोग्यMedicalवैद्यकीय