शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

मृत्यूचा सापळा अनुभवायचाय... औरंगाबादच्या बीड बायपासवर जा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 14:57 IST

अविरत  वर्दळीचा बीड  बायपास सकाळी ११ ते सायंकाळी ५ या कालावधीत जड वाहनांनी व्यापला जातो.  

ठळक मुद्देधोकादायक अन् जीव गुदमरविणाऱ्या १२ किलोमीटर कार प्रवासासाठी लागले ५३  मिनिटेबायपासवर प्रवेश खुला होताच जडवाहनचालक लहान वाहनाकरिता राखीव असलेल्या लेनवर अतिक्रमण करतात आणि प्रवास करतात.

- बापू सोळुंके

औरंगाबाद : मृत्यूचा सापळा अनुभवायचा असेल, तर औरंगाबादच्या बीड बायपासवर एकदा जाऊनच या. बेफाम  जाणारी जड वाहने व त्यांच्या कचाट्यातून मार्ग काढणारे दुचाकीस्वार व पादचारी, असे चित्र येथे दररोजच पाहावयास मिळते. अनेक जण या रस्त्यावरून नेहमीच जीवघेणा प्रवास करीत आहेत. वाहनांच्या या गर्दीतून  सामान्य माणसाला केवळ १२ किलोमीटरचा रस्ता पार करण्यास तब्बल एक तास वेळ वाया घालवावा लागत आहे. भीतीयुक्त आणि त्रस्त झालेले वाहनचालकांचे चेहरे आणि वाहनचालकांची कसरत ‘लोकमत’ने बुधवारी केलेल्या रिॲलिटी चेकमध्ये दिसून आली. 

अविरत  वर्दळीचा बीड  बायपास सकाळी ११ ते सायंकाळी ५ या कालावधीत जड वाहनांनी व्यापला जातो.  बीड बायपासच्या दोन्ही बाजूंना नागरी वसाहती वाढत आहेत. बायपास परिसर, देवळाई, सातारा गाव आणि परिसरातील लाखो नागरिकांना बायपास ओलांडून शहरात ये-जा करावी लागते. बायपासवर गतवर्षी सतत प्राणांतिक अपघात व्हायचे. यामुळे बायपासवरील जड वाहनांना सकाळी ७ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ९ या वेळेत प्रवेश मनाई करण्यात आली आहे. बीड, जालन्याकडून येणारी जडवाहने ७ ते  सकाळी ११ पर्यंत  झाल्टा फाट्याजवळ, तर धुळे, नगरकडून येणारी जड वाहने पैठण लिंक रोडजवळ रोखली जातात. ११ वाजता वाहनांना बायपासवर प्रवेश दिला जातो तेव्हा जडवाहनचालकांची  जीवघेणी स्पर्धा सुरू होते. ही स्पर्धा सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू असते. 

१२ किलोमीटर पार करण्यास लागली ५३ मिनिटेबुधवारी सकाळी ११.२९  वाजता महानुभाव आश्रम चौकीपासून झाल्टा फाट्याच्या दिशेने कार प्रवासाला सुरुवात केली. तेव्हा बायपासवर जडवाहनांनी ताबा घेतल्याचे दिसून आले. या प्रवासादरम्यान महूनगर टी-पॉइंट, बजाज रुग्णालय, एमआयटी चौक, वखार महामंडळासमोर, गोदावरी टी-पॉइंट, सातारा पोलीस ठाण्याचा दुभाजक कट, रेणुकामाता मंदिर, आयप्पामंदिर दुभाजक कट, देवळाई चौक,  नाईकनगर दुभाजक कट आदी ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. जडवाहनांच्या रांगेमधून कारला पुढे जाण्यासाठी रस्ता देत नव्हती. परिणामी, काही ठिकाणी बायपासलगतच्या कच्चा रस्त्यावरून कार न्यावी लागली. झाल्टा  फाट्यापर्यंत जाण्यासाठी १२.२२ तब्बल ५३  मिनिटे लागली, तर झाल्टा फाट्यापासून महानुभाव आश्रमपर्यंत ५९ मिनिटे लागली. 

जडवाहनचालक पाळत नाहीत नियम बायपासवर प्रवेश खुला होताच जडवाहनचालक लहान वाहनाकरिता राखीव असलेल्या लेनवर अतिक्रमण करतात आणि प्रवास करतात. डाव्या लेनवर जडवाहन आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे पोलिसांना अधिकार आहेत. मात्र, वाहनांची संख्या अधिक असल्याने पोलिसांना वाहतूक नियमन करताना कारवाईकरिता वेळ देता येत नाही. शिवाय बायपासवर साईन बोड नसल्याचा फटकाही बसतो. यामुळे या रस्त्यावरील जडवाहनांना सकाळपासून प्रवेश दिल्यास जडवाहनांची स्पर्धा कमी होऊ शकते.

रात्रीचा प्रवास महाभयंकरबायपासवर रात्री ९ नंतर जडवाहतूक सुरू होते. तेव्हा छोट्या वाहनाने बायपासवरून जाणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे असते. ट्रकचालक सर्व रस्ता व्यापतात आणि कार असो वा दुचाकीला ते रस्ता देत नाहीत. असा एकदा अनुभव आल्यापासून बायपासवरील हॉटेल आणि ढाब्यावर जेवणासाठी गेल्यावर रात्री ९ वाजेपूर्वीच जेवण आटोपून   घरी परततो. -महेंद्र घोडेले, व्यावसायिक

टॅग्स :highwayमहामार्गAurangabadऔरंगाबादTrafficवाहतूक कोंडी