वाळूज महानगरात २८ अतिक्रमणे जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 11:34 PM2019-07-08T23:34:55+5:302019-07-08T23:35:04+5:30

सोमवारी एमआयडीसीने पोलीस बंदोबस्तात महाराणा प्रताप चौक ते रांजणगाव फाटा रस्त्यावरील २८ अतिक्रमणे जमीनदोस्त केली.

In the walujcity 28 encroach clear | वाळूज महानगरात २८ अतिक्रमणे जमीनदोस्त

वाळूज महानगरात २८ अतिक्रमणे जमीनदोस्त

googlenewsNext

वाळूज महानगर : वाळूज महानगरात दोन महिन्यांनंतर एमआयडीसीने पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम सोमवारपासून हाती घेतली आहे. सोमवारी एमआयडीसीने पोलीस बंदोबस्तात महाराणा प्रताप चौक ते रांजणगाव फाटा रस्त्यावरील २८ अतिक्रमणे जमीनदोस्त केली.


वाळूज औद्योगिक क्षेत्रात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर अनेकांनी अतिक्रमण करुन व्यवसाय थाटले आहेत. यामुळे रहदारीस अडथळा होत असून, वाहतूक कोंडी व अपघाताच्या घटना घडत आहेत. यापूर्वी आॅगस्ट महिन्यात एमआयडीसीने दोन ते तीन वेळा अतिक्रमणांवर कारवाई केली होती. काही दिवसांनंतर पुन्हा अतिक्रमणे ‘जैसे थे’ झाले.

विशेष म्हणजे एमआयडीसीच्या पी-५५ या मोकळ्या भूखंडावरही अतिक्रमण करुन हॉटेलचा व्यवसाय सुरु करण्यात आला आहे. मोरे चौक, महाराणा प्रताप चौक, कोलगेट चौक, रांजणगाव फाटा आदी ठिकाणी टपरी, हातगाडी व हॉटेलच्या अतिक्रमणामुळे चौकाचा श्वास कोंडला आहे. त्यातच ग्राहक रस्त्यावरच वाहने उभी करतात.

त्यामुळे वाहतूक कोंडीचे प्रकार घडतात. एमआयडीसीने अतिक्रमणांवर कारवाईचा बडगा उगारत सोमवारी कार्यकारी अभियंता भूषण हर्षे यांच्या मार्गदर्शनाखाली स. अभियंता सुनिल व्यवहारे यांनी अतिक्रमण हटाव मोहीम राबविली.

या कारवाईत पोलीस बंदोबस्तात महाराणा प्रताप चौक, कोलगेट चौक व रांजणगाव चौकातील रहदारीस अडथळा ठरणारे २८ पेक्षा अधिक अतिक्रमणे जेसीबीच्या सहाय्याने हटविण्यात आली. दरम्यान, नुकसान टाळण्यासाठी अनेकांनी स्वत:च अतिक्रमण काढून घेतले.

कारवाईत दिलीप चौथ, आर.एच. भवर, ए.वाय. साळवे, सुरक्षा रक्षक गौतम मोरे, संजय चौथ, राजकुमार साळवे, राजू मगरे आदींनी केली. यावेळी फौजदार राजेंद्र बांगर, स.फौजदार ए.एस. सुरडकर, एस. सिद्दीकी, महाजन, संदीप धनेधर, अशोक दाभाडे, सुखदेव कोल्हे आदींनी सहभाग घेतला. टप्प्याटप्प्याने सर्व अतिक्रमणे काढण्यात येणार असल्याचे स. अभियंता सुनिल व्यवहारे यांनी सांगितले.

Web Title: In the walujcity 28 encroach clear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.