शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आधीच सिटीबस कमी, त्यात वाळूज ते पंढरपूर रिक्षा भाडेवाड दुपटीने; कामगारांच्या खिशाला कात्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 19:31 IST

औद्योगिक परिसरात पंचक्रोशीतून कामगार कामानिमित्त येतात. त्यातच अनेकजण वाळूज ते पंढरपूर असे नियमित अप-डाऊन करतात.

वाळूज महानगर :वाळूज ते पंढरपूर ऑटो रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये सर्वाधिक संख्या कामगारांची आहे. स्मार्ट सिटी बसची संख्या कमी असल्याने कामगारांसाठी ऑटोरिक्षा हाच एकमेव व सोईचा पर्याय असून औद्योगिक परिसरात कामानिमित्त ये-जा करणाऱ्या बहुतांश कामगारांना ऑटोरिक्षावर अवलंबून रहावे लागते. अचानक गुरुवारी ऑटोरिक्षा चालकांनी वाळूज ते पंढरपूर रिक्षा भाड्यामध्ये दुपटीने वाढ केली. त्याचा थेट परिणाम आर्थिक गणितावर होणार असल्याची खंत कामगारांतून व्यक्त होत आहे.

औद्योगिक परिसरात पंचक्रोशीतून कामगार कामानिमित्त येतात. त्यातच अनेकजण वाळूज ते पंढरपूर असे नियमित अप-डाऊन करतात. वाळूज येथील ऑटोरिक्षात बसणारे बहुतांश कामगार, पंढरपूर येथील कामगार चौक, तिरंगा चौक आणि पंढरपूर बाजारपेठ याठिकाणी उतरून जवळ असणाऱ्या ए, बी, सी आणि डब्लू सेक्टरमधील कंपन्यांमध्ये जातात. त्यामुळे वाळूज ते पंढरपूर ये-जा करणाऱ्या प्रवाशांची आणि कामगारांची वर्दळ रात्री उशिरापर्यंत सुरू असते. त्यातच गुरुवारी सकाळपासून अचानक ऑटोरिक्षात भाडेवाढ करण्यात आल्याने काही काळ कामगार गोंधळात पडले. काहींची चालकांसोबत शाब्दिक चकमक उडाली. तर काहींनी वाढत्या महागाईमुळे ही भाडेवाढ झाल्याचे कळताच भाडेवाढ स्विकारून वाढीव भाडे दिले.

आमच्या खिशाल झळकंपनीकडून बसची व्यवस्था फक्त कायम कामगारांसाठी आहे. आमच्यासारख्या कंत्राटी कामगारांना खासगी वाहनातून ये-जा करावी लागते. त्यात रिक्षा आमच्यासाठी सहज आणि स्वस्तात मिळणारे वाहन, पण त्यातही भाडेवाढ झाल्याने पूर्वी साडेपाचशे रुपये लागायचे तिथे आता हजारांच्या वर पैसे लागत असल्याने महिन्याचे आर्थिक गणित बिघडत असल्याबद्दलची नाराजी प्रवासी कामगार बाळू खंदारे, राजेश वाघ, अरुण जाधव, नितीन बनसोडे आदींनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरauto rickshawऑटो रिक्षाWalujवाळूज