शहरं
Join us  
Trending Stories
1
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
2
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
3
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
4
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
5
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
6
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
7
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
9
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
10
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
11
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
12
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
13
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
14
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
15
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
16
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
17
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
18
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
19
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
20
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह

वाळूज एमआयडीसी हादरली! वेल्डिंग सुरू असलेल्या ऑइल टँकरचा स्फोट; एकाचा पाय निकामी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 17:23 IST

छत्रपती संभाजीनगरच्या एमआयडीसी वाळूज औद्योगिक परिसरात ऑइल टँकरचा भीषण स्फोट

- अमेय पाठक

छत्रपती संभाजीनगर: शहरातील एमआयडीसी वाळूज औद्योगिक वसाहतीत मंगळवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडलेल्या एका भीषण स्फोटाने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली. ऑइलच्या टँकरला वेल्डिंगचे काम सुरू असताना हा अपघात घडला, ज्यामध्ये रस्त्याच्या कडेला असलेल्या एका हॉटेलचा चालक गंभीर जखमी झाला असून, त्याचा एक पाय निकामी झाला आहे.

प्लॉट क्रमांक डी-४२ समोर उभ्या असलेल्या ऑइल टँकरवर वेल्डिंगचे काम सुरू होते. काम सुरू असताना अचानक मोठा स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की, तो दूरवर ऐकू गेला. स्फोटानंतर घटनास्थळी क्षणात धुराचे मोठे लोट पसरले. या दुर्घटनेत टँकरजवळ असलेल्या एका हॉटेलचा चालक गंभीर जखमी झाला. त्याचा एक पाय निकामी झाल्याची माहिती आहे. उपस्थित कामगार आणि नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन जखमी चालकाला बाहेर काढले आणि त्याला उपचारासाठी शासकीय घाटी रुग्णालयात हलवण्यात आले.

अपघाताचे नेमके कारण काय?स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, प्राथमिक माहितीनुसार, वेल्डिंगचे काम सुरू असताना टँकरमध्ये असलेल्या ऑइलचे ज्वलनशील वायू स्फोटक ठरले असावेत, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. वेल्डिंग करताना सुरक्षेचे नियम पाळले गेले नाहीत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलीस आणि एमआयडीसी वाळूज अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने आग विझवली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, या भीषण अपघातामुळे औद्योगिक वसाहतीतील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Waluj MIDC Shaken: Oil Tanker Explosion Injures One Severely

Web Summary : A massive explosion rocked Waluj MIDC during oil tanker welding. A nearby hotel worker was critically injured, losing a leg. Welding safety lapses are suspected. Firefighters controlled the blaze, raising worker safety concerns.
टॅग्स :Waluj MIDCवाळूज एमआयडीसीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर