शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

दोन वर्षांपासून ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’; किशनचंद तनवाणींची पालकमंत्र्यांकडे जबाबदारी देण्याबाबत विचारणा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 13:01 IST

Kishanchand Tanwani : शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीमुळे तनवाणी यांना आता कोणत्याच कार्यक्रमाचे निमंत्रणही दिले जात नाही. तनवाणी पालकमंत्री सुभाष देसाई शहरात आले की त्यांना भेटतात

ठळक मुद्देपालकमंत्री आल्यावर भेटीअंती ते प्रत्येक वेळी जबाबदारी मिळणार असे सांगत आहेत. ती जबाबदारी काय असेल, दोन वर्षांपासून जबाबदारी कशात अडकली आहे

औरंगाबाद: भाजपातून शिवसेनेत आलेले माजी आमदार किशनचंद तनवाणी ( Kishanchand Tanwani ) यांना भाजपा ( BJP ) सोडणे चांगलेच महागात पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. शिवसेनेने ( Shiv Sena ) त्यांना पक्षात प्रवेश तर दिला; मात्र दोन वर्षांपासून त्यांच्यावर कोणतीही जबाबदारी न देताच ताटकळत ठेवले आहे. ( Kishanchand Tanwani's question about giving responsibility to Guardian Minister Subhash Desai ) ?

शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीमुळे तनवाणी यांना आता कोणत्याच कार्यक्रमाचे निमंत्रणही दिले जात नाही. तनवाणी पालकमंत्री सुभाष देसाई ( Subhash Desai ) शहरात आले की त्यांना भेटतात, काही जबाबदारी देता की नाही, याची विचारणा करतात. देसाईही त्यांचा रोष थोपविण्यासाठी हो म्हणून उत्तर देतात. दोन दिवसांपूर्वी देसाई शहरात आले असताना देसाईंकडून तनवाणी यांना ‘जबाबदारी दिली जाईल’, असे उत्तर मिळाल्याचे समजते. असा प्रकार दोन वर्षांपासून सुरू असल्याने तनवाणी हताश झाल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत.

तनवाणी यांना महापालिकेच्या निवडणुका घोषित होतील या पार्श्वभूमीवर शिवसेनेत घेतले. १० ते १२ वॉर्डांवर त्यांचा प्रभाव असल्यामुळे त्यांचा विचार केला गेला. परंतु कोरोनामुळे एप्रिल २०२० मध्ये होणाऱ्या मनपाच्या निवडणुका झाल्या नाहीत. निवडणुका दीड वर्षांपासून लांबल्या आहेत. त्यामुळे पक्षातील संघटनात्मक फेरबदलही केले गेले नाहीत. तनवाणी यांना शिवसेनेत घेताना महानगरप्रमुखपद देण्याबाबत ठरल्याची चर्चा आहे. परंतु त्या पदावरही त्यांना नियुक्ती दिली गेली नाही. मात्र त्यांना महानगरप्रमुखपद नको असल्याचे मध्यंतरी बोलले गेले. मागील वर्षी किमान पक्ष कार्यक्रमाचे निरोप तनवाणी यांच्यापर्यंत दिले जात होते. आता गटबाजीमुळे त्यांना निरोपही बंद झाले आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीपेक्षा भाजपा बरे होेते, अशी चर्चा त्यांच्या समर्थकांमध्ये सुरू आहे.

मनपाच्या निवडणुकांची वाट पाहत आहेतपालकमंत्री आल्यावर भेटीअंती ते प्रत्येक वेळी जबाबदारी मिळणार असे सांगत आहेत. परंतु ती जबाबदारी काय असेल, दोन वर्षांपासून जबाबदारी कशात अडकली आहे हे काही तनवाणी यांना समजण्यास तयार नाही. दोन ते चार वेळा मुंबई वाऱ्या केल्या, परंतु तेथेही काही हाती न लागल्यामुळे तनवाणींसह त्यांचे समर्थक आत्मचिंतन करीत असल्याची चर्चा आहे. महापालिकेच्या निवडणुका केव्हा लागतात, याची तनवाणी व समर्थक वाट पाहू लागले आहेत. दरम्यान, याप्रकरणी तनवाणी यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी यासंदर्भात बोलणे टाळले.

टॅग्स :Kishanchand Tanvaniकिशनचंद तनवाणीSubhash Desaiसुभाष देसाईShiv SenaशिवसेनाBJPभाजपाAurangabadऔरंगाबाद