शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

युरोपचे पाहुणे नाथसागरात; हजारो किमीच्या प्रवासानंतर शेंडी बदकांचे औरंगाबादेत आगमन

By साहेबराव हिवराळे | Updated: December 1, 2022 16:42 IST

हिवाळ्यात अन्नाच्या शोधात हजारो किमी प्रवास करून येतात

औरंगाबाद : नाथसागर जलाशयावर शेंडी बदक नर, मादी समूहाने विहार करताना आढळले असून, किमान सात ते आठ वर्षांनंतर त्यांचे दर्शन झाले आहे. शेंडी बदकांचा समूह नजरेस पडल्याने पक्षी निरीक्षकांनी आनंद व्यक्त केला.

पक्षी निरीक्षण करताना रविवारी शेंडी बदकांचा थवा दिसून आला. शेंडी बदक युरोप आणि मध्य आशियातून आपल्याकडे हिवाळ्यात अन्नाच्या शोधात हजारो किलोमीटर प्रवास करून येत असतात. नर व मादी दिसायला भिन्न असतात. नर चमकदार काळसर रंगाचा असून, पंखाच्या बाजू पांढरट रंगाच्या असतात. डोक्यावर मोठी गडद शेंडी आणि डोळा पिवळसर रंगाचा असतो. मादी ही दुधाळ तपकिरी रंगाची असून, पंखांच्या बाजू फिकट असतात. मादीचा डोळा गडद पिवळ्या रंगाचा असतो. मादीलाही शेंडी असते. इंग्रजीत या बदकाला ‘टफ्तेड पोचर्ड’ हे नाव आहे. त्याचा आकार ४० ते ४५ सेंटिमीटर एवढा असतो.

त्यांचा आहारविहार...समूहात वावरणारा हा पक्षी तलाव, जलाशये, समुद्र, गोड्या पाण्याचे सरोवर आदी ठिकाणी दिसून येतो. पाण्यात डुबकी मारून तो आपले खाद्य शोधतो. तो शैवाल, पाणवनस्पती, बिया, मृदुकाय प्राणी व इतर छोटे जलचर जीव खातो. शेंडी बदक प्रजनन युरोप आणि मध्य आशियात करतात.

हिवाळ्यातच हे पाहुणे पक्षी येताततब्बल ७ ते ८ वर्षांपूर्वी एखाद् दुसरा पक्षी जलाशयावर आढळून येत होता, आता तर त्यांचा थवाच पाहण्यास मिळत आहे. दूर अंतरावरून हे पक्षी येतात. पक्षी निरीक्षणासाठी रविवारी गेलेल्या टीमला शेंडी बदकांचा मोठा थवा पाण्यावर दिसत आहे.- डॉ. किशोर पाठक, मानद वन्यजीव रक्षक

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादenvironmentपर्यावरण