शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पहाटे बैलगाडा शर्यत खेळले, व्हायरल व्हिडीओने अडकले, ६ जणांवर गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 18:09 IST

सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव धोत्रा मार्गावर काही तरुण घोडा व बैल गाडी शर्यत लावून त्यांना पळवित असतानाचा व्हिडिओ  सोशल मीडियावर व्हायरल झाला होता

सिल्लोड (औरंगाबाद) : तालुक्यातील गोळेगाव धोत्रा येथे सार्वजनिक रस्त्यावरून घोडा व बैलगाडीची शर्यत खेळणाऱ्या सहा तरुणाविरुद्ध अजिंठा पोलीस ठाण्यात आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी शर्यतीमधील तीन घोडे, तीन बैल, तीन गाड्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. ही शर्यत १४ डिसेंबर रोजी पहाटे लावण्यात आल्याची माहिती आहे. 

सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव धोत्रा मार्गावर काही तरुण घोडा व बैल गाडी शर्यत लावून त्यांना पळवित असतानाचा व्हिडिओ  सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. काही लोकांनी ही माहिती अजिंठा पोलिसांना दिली. या व्हिडिओवरून अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित विसपुते, उपनिरीक्षक धम्मदीप काकडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल विकास चौधरी, संदीप जाधव, रविंद्र बागुलकर आदींनी तपास केला. यावेळी ही शर्यत दि.१४ डिसेंबर रोजी झाल्याचे निर्देशनात आले. 

पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत गोळेगाव येथील इस्माईलखा भिकन शहा, असलम समद देशमुख, श्रीरंग गव्हाणे, काजिमखा अहमदखा, अजिंठा येथील आमेर तर भोकरदन तालुक्यातील कल्याणी येथील सलमान शहा यांचा शर्यतीत सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. यावरून त्यांच्या विरुध्द प्रशासनाची परवानगी न घेता विनापरवाना बेकायदेशीररित्या सार्वजनिक रस्त्यावर घोडा, बैलगाडी शर्यत करून प्राण्यांना अमानुषपणे काठीने मारहाण करून जखमी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

पोलिसांनी सर्व आरोपींना तत्काळ ताब्यात घेतले. तसेच आरोपींच्या ताब्यातून तीन घोडे, तीन बैल, तीन गाड्या पोलिसांनी जप्त केल्या. दरम्यान, आरोपींची जामिनावर सुटका झाली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अजित विसपुते यांच्या मार्गद्शनाखाली उपनिरीक्षक धम्मदिप काकडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल विकास चौधरी,संदीप जाधव,रविंद्र बागुलकर आदी करीत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद