शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘ती’ व्हायरल आॅडिओ क्लिप संपादित केलेली; हे तर प्रतिमा मलिन करण्याचे षङ्यंत्र : कुलगुरू चोपडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 17:31 IST

आपली प्रतिमा मलिन करण्याचे षङ्यंत्र रचण्यात आल्याचा आरोप कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी पत्रकार परिषदेत केला.

औरंगाबाद : ‘ती’ व्हायरल आॅडिओ क्लिप संपादित केलेली आहे. याविरोधात पोलिसांत तक्रार दिली असून, आपली प्रतिमा मलिन करण्याचे षङ्यंत्र रचण्यात आल्याचा आरोप कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी पत्रकार परिषदेत केला.

विद्यापीठात कंत्राटी कर्मचाऱ्यांचे ९ आॅक्टोबर रोजी आंदोलन सुरू होते. सायं.८ वाजता आंदोलक प्रशासकीय इमारतीचा दरवाजा तोडून आत येण्याची शक्यता  होती. यामुळे माझ्या गाडीतून अधिसभा सदस्य विजय सुबकडे  आणि त्यांचे मित्र सचिन बोर्डे यांनी मला घरापर्यंत दुसऱ्या मार्गाने आणले. घरापर्यंत आल्यामुळे मी त्यांना चहा घेण्यासाठी आतमध्ये बोलावले. काही वेळाने व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. शंकर अंभोरे आले. माझ्या घरी कोणतीही कार्यालयीन बैठक नव्हती.

जे काही बोलणे झाले, ती वैयक्तिक चर्चा होती. तरीही त्या चर्चेचे  रेकॉर्डिंग करण्यात आले. ते कोणी केले याविषयी कोणाचे नाव घेणार नाही. तो तपास पोलीस करत आहेत. मात्र, संबंधित आॅडिओत असलेले शब्द, वाक्य हे माझे नाहीत.  कोणीतरी संपादित करून ही आॅडिओ व्हायरल केली. कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन मोडीत काढण्याचे आदेश त्या आॅडिओत आहेत. मात्र मी दुसऱ्या दिवशी तब्बल चार तास कंत्राटी कर्मचाऱ्याशी चर्चा करून हा प्रश्न सोडवला. यावरून कोणीतरी माझी बदनामी करण्यासाठी हे षङ्यंत्र रचल्याचे कुलगुरूनी स्पष्ट केले.  माझ्या व्यक्ती स्वातंत्र्याचा भंग झाल्याची तक्रार दाखल केली आहे. पोलीस तपास करून उपस्थितांपैकी कोणी आॅडिओ केले, हे समोर आणतील,असेही त्यांनी सांगितले.

...आता हा विषय थांबवाविद्यापीठाचे नॅक पुढील महिन्यात होणार आहे. विद्यापीठाच्या हितासाठी वादविवाद होणारे विषय थांबवा, असे आवाहनही कुलगुरूंनी यावेळी केले.  

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्रEducationशिक्षणPoliceपोलिस