शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

विन्टोजेनो प्रस्तुत लोकमत महामॅरेथॉन : औरंगाबादमध्ये १६ डिसेंबरला रंगणार थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 19:22 IST

संपूर्ण महाराष्ट्रातील लोकप्रियतेचे शिखर गाठणाऱ्या महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी प्रचंड उत्कंठा निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देधावपटू ठसा उमटवण्यासाठी आतुर५ लाखांहून जास्त रकमेची एकत्रित आकर्षक बक्षिसे 

औरंगाबाद : लोकमत समूहातर्फे महामॅरेथॉनची घोषणा होताच संपूर्ण महाराष्ट्रातील लोकप्रियतेचे शिखर गाठणाऱ्या महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी प्रचंड उत्कंठा निर्माण झाली आहे. यंदा विन्टोजेनो प्रस्तुत लोकमत महामॅरेथॉनचा थरार औरंगाबादला १६ डिसेंबर रोजी रंगणार आहे. 

लोकप्रियतेचे मैलाचे दगड पार करणाऱ्या या महामॅरेथॉनमध्ये आपला ठसा उमटवण्यासाठी महाराष्ट्रातील हजारो धावपटू तासन्तास मैदानावर घाम गाळत आहेत. विशेष म्हणजे या महामॅरेथॉनमध्ये नोंदणी करून आपला सहभाग निश्चित करण्यासाठी राज्यभरातील धावपटू, प्रतिष्ठित नागरिक, महिला आणि उदयोन्मुख खेळाडूंत चुरस वाढली आहे. गतवर्षी ऐतिहासिक औरंगाबादेत आयोजित महामॅरेथॉनला उदंड प्रतिसाद मिळाला. अद्ययावत तंत्रज्ञानाचा पुरेपूर उपयोग झालेली ही अत्युच्च दर्जाची लोकमत समूहाची महामॅरेथॉन असल्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया धावपटूंमध्ये होती.

यंदाची महामॅरेथॉनदेखील आणखी दर्जेदार ठरेल, असा विश्वास धावपटूंत आहे. या महामॅरेथॉनची तयारी करणाऱ्या धावपटूंनी विविध शहरांतील रस्ते फुलून गेले आहेत. अशीच अवस्था राज्यभरातील मैदानांवर आहे. मैदानावर भल्या पहाटे हजारे धावपटू कसून सराव करीत असल्याचे चित्र आहे. नागरिक तंदुरुस्त राहावेत या हेतूने आयोजित  ही महामॅरेथॉन ‘फन रन’ (१२ वर्षांपेक्षा जास्त, धावण्याचा छंद असणाऱ्यांसाठी), १0 कि.मी.ची पॉवर रन (१६ पेक्षा जास्त वर्षांवरील) आणि २१ कि. मी. (१८ पेक्षा जास्त) असणार आहे. त्यात फॅमिली रन ३ कि.मी. अंतराची असणार आहे. ती सर्वांसाठी खुली असेल. त्याचप्रमाणे लष्करातील धावपटूंसाठी वेगळा गट ठेवण्यात आला आहे.

नावनोंदणीसाठी मोजकेच दिवस शिल्लक

सीझन २ ला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर आता पुन्हा एकदा अख्खा महाराष्ट्र मॅरेथॉनमय होणार... लोकमत औरंगाबाद महामॅरेथॉन सीझन ३ साठी आजच नाव नोंदणी करा. 

संपर्क : या महामॅरेथॉनमध्ये नाव नोंदविण्यास धावपटूंमध्ये प्रचंड उत्साह आहे. धावपटूंना आपल्या नावाची नावनोंदणी आपापल्या शहरातील लोकमत कार्यालयात करता येईल. अधिक माहिती www.mahamarathon.com या संकेतस्थळावर व 9130239424 या क्रमांकावर मिळेल. 

टॅग्स :MarathonमॅरेथॉनLokmatलोकमतAurangabadऔरंगाबाद