शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

जलयुक्त शिवार योजनेवरील दक्षता चौकशी अहवाल मार्चअखेरपर्यंत देणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 19:23 IST

प्रादेशिक दक्षता व गुणनियंत्रक पथकाचे प्रमुख विजय देवराज हे २६ व २७ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथे चौकशीनिमित्त आले; परंतु ती चौकशी साशंक असल्याचा मुद्दा विधानसभेत लोकप्रतिनिधींनी उपस्थित केल्यानंतर १९ मार्च रोजी त्यांनी दिवसभर काही संशयित कामे तपासण्याचा प्रयत्न केला. 

औरंगाबाद : शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेत लघु सिंचन जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी कोट्यवधी रुपयांच्या निधीतून नियमबाह्य, बेकायदेशीर कामे केल्याचे अधीक्षक अभियंता व्ही. नाथ यांनी केलेल्या चौकशी अहवालानुसार समोर आलेले असताना पुन्हा नव्याने ठाणे दक्षता समितीकडून ‘त्या’ गैरव्यवहाराची चौकशी सुरू झाली आहे. प्रादेशिक दक्षता व गुणनियंत्रक पथकाचे प्रमुख विजय देवराज हे २६ व २७ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथे चौकशीनिमित्त आले; परंतु ती चौकशी साशंक असल्याचा मुद्दा विधानसभेत लोकप्रतिनिधींनी उपस्थित केल्यानंतर १९ मार्च रोजी त्यांनी दिवसभर काही संशयित कामे तपासण्याचा प्रयत्न केला. 

अधिवेशनात कामांप्रकरणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर १५ दिवसांतच देवराज यांना पुन्हा स्थळपाहणी व चौकशीसाठी यावे लागले.  सिमेंंट बंधारा कामांची देयके न देता इतर कामांची देयके काढून शासनाची फसवणूक केल्याचा ठपका अधीक्षक अभियंता व्ही.बी. नाथ यांनी कार्यकारी अभियंता काळे यांच्या प्रकरणात केलेल्या चौकशी अहवालात ठेवला. दुरुस्ती आणि सिमेंट बंधार्‍यांच्या कामांसाठी वर्ष २०१६-१७ मध्ये २५ कोटी ४१ लाख रुपये निधी कार्यकारी अभियंता काळे यांना वर्ग करण्यात आला. हा निधी वर्ष २०१६-१७ मध्ये पूर्ण झालेल्या कामांसाठी वापरण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी जलसंधारण, कार्यकारी अभियंत्यांना दिले होते; परंतु अभियंत्यांनी २०१६-१७ मधील कामांसाठी १३ कोटी १९ लाख व २०१५-१६ या वर्षात केलेल्या कामांसाठी ९ कोटी ६३ लाख रुपये खर्च केले. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार वर्ष २०१५-१६ मधील कामांची बिले देण्यासाठी हा निधी नव्हता. २०१६ मध्ये गंगापूर उपविभागात कामे न करता बिले देण्यात आली. 

देवराज यांचे मत असे३१ मार्चपर्यंत सदरील चौकशीचा अहवाल मुख्य अभियंत्यांना सादर करण्यात येईल. अहवालाबाबत तेच माहिती देतील, असे चौकशी पथकप्रमुख देवराज यांनी सांगितले. अभियंता काळे यांनाच घेऊन स्थळपाहणी व इतर चौकशी सुरू असल्याची चर्चा आहे, यावर देवराज म्हणाले, तो आरोप बिनबुडाचा आहे. मी स्वत: चौकशी करीत आहे. काही तथ्य आढळले आहे काय चौकशीमध्ये, ते म्हणाले, सध्या काहीही सांगता येणार नाही. ३१ मार्चपर्यंत अहवाल देण्याचा प्रयत्न असून, मुख्य अभियंत्यांकडूनच अहवालाची माहिती मिळेल.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारAurangabadऔरंगाबादMONEYपैसाAgriculture Sectorशेती क्षेत्र