शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरातील विद्यादीप बालगृहाला टाळे; अनाथ मुलींचे मुंबई, राहुरीसह अन्यत्र स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 18:56 IST

छावणीच्या विद्यादीप बालगृहातून नऊ मुलींनी ३० जून रोजी पलायन केल्याचे प्रकरण राज्यभरात चर्चेत आले.

छत्रपती संभाजीनगर : मुलींचा छळ व अमानवीय वागणूक दिल्या प्रकरणात विद्यादीप बालगृहाची मान्यता रद्द झाल्यानंतर मुलींना तत्काळ अन्यत्र स्थलांतरित करण्याचे आदेश न्यायालयासह राज्य सरकारने दिले होते. अखेर, गेल्या तीन दिवसांत ७९ मुलींना मुंबई, राहुरीसह शहरातील अन्य बालगृहांत पाठवण्यात आले. ३० जूनच्या मुलींच्या पलायनानंतर अखेर १८ दिवसांनी शुक्रवारी ७० वर्षांपेक्षाही जुने विद्यादीप बालगृह अखेर पोरके झाले.

छावणीच्या विद्यादीप बालगृहातून नऊ मुलींनी ३० जून रोजी पलायन केल्याचे प्रकरण राज्यभरात चर्चेत आले. विधिमंडळ अधिवेशनात विरोधी पक्षाने हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बालगृहाची मान्यता रद्द करण्याचे आदेश दिले. नऊपैकी एका मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून सहायक अधीक्षिका वेलरी भगवान जोसेफ, सिस्टर सुचिता भास्कर गायकवाड, केअर टेकर अलका फकीर साळुंके यांना अटक करण्यात आली होती.

बुधवारी औरंगाबाद खंडपीठाने विद्यादीप बालगृहातील मुलींचे स्थलांतर का केले नाही, अशी विचारणा करत केलेल्या कारवाईची माहिती सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर बाल कल्याण समितीने राज्यभरातील सर्व बालगृहांना पत्र पाठवून रिक्त जागांबाबत विचारणा केली होती. त्यानंतर मुंबईच्या माटुुंग्यातील बालगृहात ११, राहुरीच्या बालगृहात २२ तर अन्य मुलींना शहरातील बालगृहात पाठवण्यात आल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

साध्या वेशात महिला पोलिस, सुस्थितीत वाहनांचा वापरतीन दिवसांपासून मुलींना हलविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. साध्या वेशातील महिला पोलिसांच्या बंदोबस्तात वाहनांमधून मुलींचे स्थलांतर करावे, प्रवासादरम्यान खाण्यापिण्याची योग्य काळजी घ्यावी, असे आदेश बाल कल्याण समितीने दिले होते.

शहरात आता एकच संस्थाविद्यादीपची मान्यता रद्द झाल्यानंतर क्रमाने वाळूजमधील एका बालगृहाने स्वत:हून मुलींचा सांभाळ अशक्य असल्याचे सांगून बालगृह बंद करण्यासाठी शासनाला पत्र पाठवले आहे. त्यामुळे शहरात आता केवळ एकच बालगृह राहिले असून त्याची १०० मुलींची क्षमता आहे.

नियम पालन करुन स्थलांतरसर्व निर्देशांचे पालनसंबंधित बालगृहांना सदर मुलींची योग्य काळजी घेण्यासाठी संवाद साधला आहे. तिकडे त्यांचे नियमाप्रमाणे शिक्षण सुरू होईल. नियम, निकर्षांचे पालन करुन मुलींचे स्थलांतर करण्यात आले.- ॲड. आशा शेरखाने-कटके, अध्यक्ष, बाल कल्याण समिती.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी