शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Video: विद्यापीठात राडा! एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांना आंबेडकरी संघटनांकडून बेदम चोप

By राम शिनगारे | Updated: October 17, 2023 19:48 IST

या प्रकरणी दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया बेगमपुरा पोलिस ठाण्यात सुरू असल्याची माहिती आहे.

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ठिकठिकाणी भितींवर 'एबीव्हीपी' ही इंग्रजी अक्षरे रातोरात रंगविण्यात आली.एवढेच नाही तर महात्मा फुले-डॉ.आंबेडकर विचारधारा व संशोधन केंद्र या नावाच्या पाटीवर फुले-आंबेडकर नावावर 'एबीव्हीपी' असे लिहिण्यात आले. त्यामुळे संतापलेल्या आंबेडकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) पदाधिकाऱ्यांना उपहारग्रहात बेदम चोप दिला. हा प्रकार मंगळवारी ( दि.१७) दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडला. या प्रकरणी दोन्ही गट परस्पर विरोधी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया बेगमपुरा पोलिस ठाण्यात सुरू होती.

विद्यापीठातील विविध विभागांच्या भिंतीवर 'एबीव्हीपी','जॉईन एबीव्हीपी'अशा पद्धतीने दोन दिवसांपूर्वी रात्री लिहिण्यात आले होते. त्यावर आंबेडकरी संघटना, एसएफआयसह इतर संघटनांनी आक्षेप नोंदविण्यात आला.विद्यापीठ परिसराचे विद्रुपीकरण केल्यामुळे संबंधितांवर कारवाईची मागणीही करण्यात आली. ही अक्षरे १३ ऑक्टोबरच्या रात्री लिहिण्यात आली होती. त्यानंतर सलग दोन दिवस सुट्या असल्यामुळे त्याकडे कोणाचेही लक्ष गेले नाही. १६ ऑक्टोबर रोजी एसएफआयसह इतर विद्यार्थी संघटनांनी कुलगुरूंना निवेदन देत विद्यापीठाचे विद्रुपकरण करणाऱ्या अभाविपच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली होती. विद्यापीठ प्रशासनाने वाद वाढण्याची चिन्हे पाहून स्वतःहून जेवढ्या ठिकाणी 'एबीव्हीपी' अशी अक्षरे लिहिण्यात आली होती ती सर्व पांढरा रंग लावून पुसून टाकली.

दरम्यान, 'महात्मा फुले-डॉ.आंबेडकर विचारधारा व संशोधन केंद्रा'च्या नावावर 'एबीव्हीपी'असे लिहिल्यामुळे आंबेडकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तिव्र संताप होता. त्यामुळे १० ते १५ कार्यकर्त्यांनी मंगळवारी दुपारी मुख्य प्रशासकीय इमारतीसमोरील उपहारग्रहात चहा पित बसलेल्या अभाविपच्या पदाधिकाऱ्यांना जाब विचारला. त्यात झालेल्या बाचाबाचीत अभाविपच्या पदाधिकाऱ्यांना बेदम चोप देण्यात आला. तेव्हा अभाविपच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य इमारतीमध्ये धाव घेतली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. दरम्यान, एबीव्हीपीवर कारवाईची मागणी करत उद्या विद्यापीठात शैक्षणिक बंदचे आवाहन रिपब्लिकन विद्यार्थी सेना, पँथर्स रिपब्लिकन विद्यार्थी आघाडी, रिपब्लिकन बहुजन सेना, सम्यक विद्यार्थी आंदोलन यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducationशिक्षणAurangabadऔरंगाबाद