शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

video: कडक उन्हात वऱ्हाड निघाले फिरत्या मंडपात; वऱ्हाडींची मनसोक्त नृत्याची हौस पुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 12:04 IST

भरदुपारी कडक उन्हात क्रांती चौकातून वरात गेली, फिरत्या कापडी मंडपात वऱ्हाडीनीही संगीताच्या तालावर नृत्य केले.

- प्रशांत तेलवाडकरऔरंगाबाद : बुधवारी भरदुपारच्या उन्हात अंग भाजून निघत होते... थोड्या थोड्या वेळाने लोक पाणी, लिंबू सरबत, ताक पीत होते... अशा उन्हात घरातून बाहेर पडण्याच्या विचाराने अनेकांना घाम फुटत होता... मात्र, त्याच वेळी क्रांती चौकात एक वरात चालली होती. जिथे थोडे चालले की दम लागत होता.. तिथे वऱ्हाडी मनसोक्त झिंगाट नृत्य करीत होते. कारण, त्यांना ऊन लागत नव्हते. खास वऱ्हाडींसाठी चालता, फिरता कापडी मंडप आणण्यात आला होता.

कडक उन्हाळा.. त्यात लग्नतिथी व मुहूर्त भरदुपारचा. वरात काढायची तेही उन्हाची पर्वा न करता.. मग शक्कल लढविण्यात आली. इंदूरहून खास फिरता मंडप शहरात आणण्यात आला. मंडपाला खालून चारी बाजूने चाक व तो मंडप ओढण्यासाठी मजुरांची व्यवस्था अशा कापडी मंडपाच्या सावलीत बँड पथकातील कलाकार वऱ्हाडी चालत होते. मधील मंडपामध्ये काही वऱ्हाडी नृत्य करीत होते. मंडपाच्या सावलीने त्यांना उन्हाचा त्रास झाला नाही. पहिल्यांदाच शहरात असा वरातीचा चालता मंडप पाहून रस्त्याने जाणारे वाहनधारक थोडा वेळ थांबून ही वरात पाहत होते. क्रांती चौकाकडून ही वरात उस्मानपुऱ्याकडे गेली.

जिथे कल्पकता, नावीन्य तिथे व्यवसायाला संधी असते. प्रत्येक लग्नसोहळ्यात कल्पकता व नावीन्य हवे असते. ज्यास हे समजले, तो व्यावसायिक स्पर्धेत टिकून राहतो. या फिरत्या मंडपाद्वारे हे सिद्ध झाले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादmarriageलग्न