शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

बीड पोलिसांचा ‘तो’ व्हिडिओ लोकप्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 12:01 AM

हरवलेल्या मुलाला सीसी टीव्हीच्या माध्यमातून आईपर्यंत पोहोचविले. दरम्यानच्या काळात पोलिसांनी हायटेक यंत्रणा राबविली. त्यामुळे त्या चिमुकल्याला आई, तर आईला पोटचा गोळा भेटला. हा व्हिडिओ पाहून अनेकांना गहिवरून आले

सोमनाथ खताळ ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : हरवलेल्या मुलाला सीसी टीव्हीच्या माध्यमातून आईपर्यंत पोहोचविले. दरम्यानच्या काळात पोलिसांनी हायटेक यंत्रणा राबविली. त्यामुळे त्या चिमुकल्याला आई, तर आईला पोटचा गोळा भेटला. हा व्हिडिओ पाहून अनेकांना गहिवरून आले. खाकीतील माणुसकीचे दर्शन घडविणारा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, तेवढाच लोकप्रिय ठरत आहे.शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी १८ चौकांत ६० सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. याच्यावर आठवड्यातील २४ तास नजर ठेवण्यासाठी नियंत्रण कक्षात विशेष पोलीस नियंत्रण कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. या सीसीटीव्हीमुळे शहरातील अपघात, विस्कळीत वाहतूक, महिलांची छेडछाड, साखळीचोर आदींची माहिती तात्काळ मिळत असून, गुन्हेगारीला आळा बसविण्यासाठी सीसी टीव्ही कॅमे-यांची मोलाची मदत होत आहे.आईपासून दुरावलेल्या मुलाचा शोध घेण्यात सीसी टीव्हीमुळे मदत झाली. यानंतर नातेवाईकांकडून पोलिसांचा सत्कार केला जातो. खाकीतील माणुसकीचे दर्शन घडविण्याबरोबरच कर्तव्यतत्पर पोलिसांची ओळख जनसामान्यांना होते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे ही बाब समोर आली. या व्हिडिओमध्ये ख-याखु-या पोलिसांनी उत्कृष्ट भूमिका बजावली आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पो.नि. दिनेश आहेर व त्यांचे सहकारी, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या फौजदार दीपाली गित्ते, एस.एस.भारती, रेखा गोरे, आयुष काळे (मुलगा), रंजना सांगळे, गांधारी मस्के, निशा घुले, सोनाली चौरे, सतिष बहिरवाळ, शेख शमीम पाशा, राठोड आदींनी भूमिका पार पाडली आहे.साखळी चोरांपासून सावध राहण्यासंदर्भातच्या व्हिडिओमध्ये चिडीमार पथकाच्या मीरा रेडेकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. चोरांना सीसीटीव्हीमार्फत शोधण्यासाठी पो.नि. दिनेश आहेर यांच्यासह पथकाने यशस्वी काम केले.