शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
2
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
3
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
4
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
5
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
6
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
7
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
8
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
9
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
10
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
11
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
12
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
13
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
14
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
15
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
16
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
17
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
18
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
19
Maharashtra Rain: साताऱ्यात पुन्हा वळीव बरसला; यवतेश्वर घाटात टॉवर कोसळला! 
20
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?

औरंगाबादच्या देवळाई चौकातील अपघातात गर्भवती महिलेचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 00:22 IST

देवळाई चौकात वाहतूक सिग्नलवर पतीसह दुचाकीवर जाणाऱ्या एका गर्भवती महिलेच्या डोक्यावरून ट्रकचे मागील चाक गेल्याने डोक्याचा चेंदामेंदा झाला. ही हृदयद्रावक घटना मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. दुचाकीस्वार असलेला महिलेचा पती अपघातात दूरवर फेकला जाऊन गंभीर जखमी झाला. त्याच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहे.

ठळक मुद्देपती गंभीर जखमी : वाहतूक पोलीस बाभळीच्या सावलीतून पाहतात गंमत; आणखी किती बळी घेणार?

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : देवळाई चौकात वाहतूक सिग्नलवर पतीसह दुचाकीवर जाणाऱ्या एका गर्भवती महिलेच्या डोक्यावरून ट्रकचे मागील चाक गेल्याने डोक्याचा चेंदामेंदा झाला. ही हृदयद्रावक घटना मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. दुचाकीस्वार असलेला महिलेचा पती अपघातात दूरवर फेकला जाऊन गंभीर जखमी झाला. त्याच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहे.अनिता विठ्ठल आल्हाट (२७, रा. सोनवाडी,ता. पैठण) असे मयत महिलेचे नाव आहे, तर तिचा पती विठ्ठल आल्हाट (३0) याला अपघातानंतर तातडीने खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. शहरातील खाजगी रुग्णालयात काही तपासणी करण्यासाठी दोघे पती-पत्नी पैठणहून शहरात आले होते. देवळाई चौकात एक अवजड ट्रक (एमएच ४८- एजी ६२१७) ची दुचाकी (एमएच २०- ईएम ८९०४) ला धडक लागली. दुचाकीवरील विठठ्ल आणि अनिता हे शिवाजीनगरकडून एमआयटीकडे निघाले होते. त्याचवेळी गांधेलीकडून एमआयटीकडे हा ट्रक चालला होता. ट्रक सिग्नलला थांबलेला होता. काही वेळाने सिग्नल सुरूझाल्याने ट्रक एमआयटीकडे जाण्यास निघाला. त्याचवेळी विठ्ठल आल्हाट हेदेखील देवळाई चौकातून दुचाकीवरून एमआयटीकडे वेगाने निघाले. मात्र, यावेळी त्यांचा वेगाचा अंदाज चुकला ट्रक आणि त्यांच्या दुचाकीची जोराने धडक झाली. दुचाकीवर बसलेल्या अनिता या ट्रकच्या पाठीमागील चाकाखाली आल्या. ट्रक वेगाने असल्यामुळे आणि त्यांच्या डोक्यावरून चाक गेल्याने त्या जागीच गतप्राण झाल्या, तर विठ्ठल हे दूर फेकले गेले.पोलीस घटनास्थळीवाहतूक शाखेचे निरीक्षक भारत काकडे, सहायक फौजदार वाय. ए. शेख, हवालदार ए. ए. मरकड आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सातारा पोलिसांनी ट्रक जप्त करून मृतदेह घाटीला पाठविण्यात आला. जखमी विठ्ठल मुरलीधर आल्हाट यास खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.वाहतूक खोळंबाअपघातामुळे देवळाई चौकात आणि बीड बायपासवर दुतर्फा वाहतूक खोळंबली होती. वाहतूक शाखेने ती सुरळीत केली. पोलिसांनी आल्हाट यांच्या नातेवाईकांशी संपर्क करून अपघाताची माहिती दिली. अनिता यांचा मृतदेह घाटीत नेण्यात आला होता. घाटीतील शवागाराजवळ नातेवाईकांची गर्दी झाली होती. या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. उशिरापर्यंत कंटेनरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.बघे वाहतूक पोलीस आणि आरामाची जागादेवळाई चौकात वाहतूक नियंत्रण करण्यासाठी दररोज दोन-तीन पोलीस असतात. हे पोलीस देवळाई चौकातून रेल्वेपटरीकडे जाणाºया रस्त्यावर एका बाभळीच्या झाडाखाली आराम करताना दिसतात. याठिकाणी पोलिसांनी स्वत:च्या सोयीसाठी बाभळीच्या झाडावर हिरवी मॅट टांगून सावली केली आहे. चौकातील वाहतूक नियंंत्रणाचे काम सोडून पोलीस याठिकाणी गप्पा मारताना दिसतात.मंगळवारी सकाळी देवळाई चौकात नागनाथ बनसोडे, सईद खान मेहमूद खान आणि दत्तू नागरे या तीन पोलीस कर्मचाºयांची ‘ड्यूटी’ होती. मात्र, यापैकी एकहीजण चौकात वाहतूक नियंत्रणासाठी नव्हता.लोकमत प्रतिनिधीने सायंकाळी चार वाजता या चौकात पाहणी केली असता पोलीस त्यांच्या नेहमीच्या सावलीच्या ठिकाणी दुचाकीवर बसून असल्याचे दिसले.

टॅग्स :AccidentअपघातAurangabadऔरंगाबादpregnant womanगर्भवती महिलाDeathमृत्यू