शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

कुलगुरू बी. ए. चोपडे यांची पदवी हरवली; बेगमपुरा पोलीस घेत आहेत शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 20:04 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांची पदवी विद्यापीठ परिसरातुन हरवली आहे. याविषयी डॉ. चोपडे यांनीच बेगमपूरा पोलीस ठाण्यात ३० जानेवारी रोजी तक्रार दाखल केली आहे. आता पोलीस कुलगुरूंच्या हरवलेल्या पदवीचा शोध घेत आहेत.

ठळक मुद्देकुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांची ‘‘प्री- डिग्री सायन्स’ची पदवी कराड येथील महाविद्यालयातील आहे. या विषयी डॉ. चोपडे यांनीच बेगमपूरा पोलीस ठाण्यात ३० जानेवारी रोजी तक्रार दाखल केली आहे.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांची पदवी विद्यापीठ परिसरातुन हरवली आहे. या विषयी डॉ. चोपडे यांनीच बेगमपूरा पोलीस ठाण्यात ३० जानेवारी रोजी तक्रार दाखल केली आहे. आता पोलीस कुलगुरूंच्या हरवलेल्या पदवीचा शोध घेत आहेत.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असतात. वाराणसी येथील बनारस हिंदु विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड झाल्याची बातमी नुकतीच आली होती. मात्र पुढे हे सर्व चुकीचे असल्याचे स्पष्टीकरण मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दिले. या चर्चेला आठवडा होताच आता कुलगुरूंची पदवी हरवली असल्याची माहिती समोर आली आहे. कुलगुरूंनी बेगमपूरा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,  ‘मी बाळू आनंदा चोपडे, वय ६१.५, व्यवसाय नोकरी, पत्ता- माननीय कुलगुरूंचे निवासस्थान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद. सदर विषयी अपणास कळविण्यात येते की मला ‘प्री- डिग्री सायन्स’ची पदवी १९७४ साली कराड कॉलेज येथून मिळाली होती. सदरील २२ जानेवारी २०१८ रोजी विद्यापीठ परिसरात हरवली आहे. सदरी ही तक्रार आपणास देत आहे. करीता सदरील तक्रारी संदर्भात पुढील योग्य कार्यवाही करून सहकार्य करावे.’ यावरून पोलीसांनी प्रॉपर्टी मिसिंग नोंद केली असून, पोलीस हेड कॉन्सीटेबल एस.आर. पवार हे तपास करत आहेत. याविषयी डॉ. चोपडे यांच्याशी संपर्क साधला असता, प्रतिसाद मिळाला नाही. कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनीही याविषयी माहिती नसल्याचे सांगितले.

कुलगुरूंकडे देश-विदेशातील पदव्याकुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांची ‘‘प्री- डिग्री सायन्स’ची पदवी कराड येथील महाविद्यालयातील आहे. तर त्यांनी शिवाजी विद्यापीठातुन १९७८ साली सूक्ष्मजीवशास्त्र विषयात पदवी मिळवली. १९८० मध्ये एमएसस्सीची पदवी मिळवली. यानंतर ब्रिटनमधील नॉटिंगहॅम विद्यापीठातुन पीएच. डी. पदवी प्राप्त केली. तर १९९६ साली अमेरिकेतील शिकागो विद्यापीठातुन पोस्ट डॉक्टरेट पदवी मिळविलेली आहे.

सोशल मिडियावर तक्रार व्हायरलकुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी पोलीस ठाण्यात दिलेली तक्रार तब्बल १० दिवसांनी उघडकीस आली. यानंतर ही तक्रार सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. शैक्षणिक वर्तुळातही याविषयी कुतुहलाने विचारणा होत आहे. कुलगुरूंची पदवी सापडणार की नाही, याविषयीही चर्चा  रंगली आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादbegampuraबेगमपुराThiefचोर