शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

ज्येष्ठ व्यापारी मदनभाई जालनावाला यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 1:29 AM

शहरातील ज्येष्ठ व्यापारी मदनभाई नवनीतदास जालनावाला (७१) यांचे मंगळवारी (दि.१७) सायंकाळी हृदयविकाराने खाजगी रुग्णालयात निधन झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील ज्येष्ठ व्यापारी मदनभाई नवनीतदास जालनावाला (७१) यांचे मंगळवारी (दि.१७) सायंकाळी हृदयविकाराने खाजगी रुग्णालयात निधन झाले.सुपारी हनुमान रोडवरील त्यांच्या निवासस्थानापासून बुधवारी (दि.१८) सकाळी १० वा. अंत्ययात्रा निघणार आहे. त्यांच्या पार्थिवावर कैलासनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, भाऊ, दोन बहिणी, नातवंडे असा परिवार आहे. व्यापाऱ्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी ते शेवटच्या क्षणापर्यंत सक्रिय होते. जिल्हा व्यापारी महासंघाच्या स्थापनेमध्येही त्यांची भूमिका महत्त्वाची होती. त्यांनी महासंघाचे उपाध्यक्षपदही भूषविले होते. हसतमुख चेहरा, रुबाबदार मिशा अशी त्यांची ओळख बनली होती. औरंगाबाद इंडस्ट्रियल सप्लायर्स असोसिएशनचे (आयसा) अध्यक्ष, औरंगाबाद इलेक्ट्रिकल्स असोसिएशनचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. विशेषत: व्हॅट, जकात, एलबीटी रद्द करण्यासाठी शहरातून सुरू झालेल्या आंदोलनात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. व्यापारी महासंघाचा जिल्ह्यात विस्तार करण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले. मराठवाडा चेंबर आॅफ कॉमर्स, मासिआ, सीएमआयएच्या उपक्रमातही हजेरी लावत असत. ते सामाजिक कार्यातही तेवढेच अग्रेसर होते. लायन्स क्लब आॅफ औरंगाबादच्या अध्यक्षपदासह मागील ३५ वर्षांत त्यांनी या क्लबची विविध पदे भूषवीत आपल्या कार्याचा ठसा उमटविला. लायन्स बालसदनच्या उभारणीतही त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. योगदानाबद्दल लायन्स क्लबतर्फे त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला होता. रामकृष्णदास सेवा ट्रस्टचे माजी सचिव, गुजराती समाज विकास मंडळाचे माजी सचिव, द्वारकाधीश मंदिर, सात मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. नागर समाजाच्या संघटनेतही त्यांनी सचिवपदावर कार्य केले. गुजराती समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी परिश्रम घेतले. लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी रात्री त्यांच्या घरी जाऊन पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले व कुटुंबियांचे सांत्वन केले.

टॅग्स :Deathमृत्यूSocialसामाजिक