शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

पहिल्याच दिवशी ६२ जणांना दिले र्र्र्ई-चालान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 00:04 IST

औरंगाबाद : वाहतूक नियम मोडून वाहने पळविणाऱ्यांविरोधात मंगळवारपासून ई-चालान देण्यास सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी ६२ वाहनचालकांना ई-चालान देऊन त्यांच्याकडून ...

ठळक मुद्देवाहतूक पोलीस : शहरातील वाहतूक पोलिसांना मिळाल्या शंभर ई-चालान मशीन

औरंगाबाद : वाहतूक नियम मोडून वाहने पळविणाऱ्यांविरोधात मंगळवारपासून ई-चालान देण्यास सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी ६२ वाहनचालकांना ई-चालान देऊन त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला.पोलीस आयुक्त कार्यालयासमोरून विना हेल्मेट दुचाकी पळविणाऱ्याला पकडून पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या हस्ते त्याला पहिले ई-चालान देण्यात आले. यावेळी उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे, सहायक आयुक्त ज्ञानोबा मुंढे, पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज यांच्यासह वाहतूक कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. वाहतूक नियमांचा भंग करणाºया वाहनचालकांना थेट ई-चालान देण्यास सुरुवात झाली. वाहतूक नियम मोडणाºयांकडून क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, एटीएम कार्ड स्वॅप करून जागेवर दंड वसूल करण्यात आले. पोलीस आयुक्तालयांतर्गत पाच वाहतूक शाखा कार्यरत असून, प्रत्येक शाखेला २० ई-चालान मशीन देण्यात आल्या. वाहतूक विभागातील सहायक आयुक्त, पोलीस निरीक्षक सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक आणि ३२९ वाहतूक कर्मचाºयांना ई-चालानचे प्रशिक्षण देण्यात आले.पोलीस आयुक्तांनी दिले पाचशे रुपयेविना हेल्मेट दुचाकी चालकाला पकडल्यानंतर त्यास ई-चालानचे पाचशे रुपये तडजोड रक्कम म्हणून भरण्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले. तेव्हा त्याने त्याच्याकडे पैसे नसल्याचे पोलिसांना सांगितले. ही रक्कम एटीएम कार्ड, डेबिट कार्डद्वारे भरण्याची सुविधा आजपासून उपलब्ध झाल्याचे सांगितले. त्यावेळी त्याने त्याच्याकडे एटीएम कार्डच नसल्याचे नमूद केले. त्याची हतबलता पाहून पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी त्यांच्या पाकिटातील पाचशे रुपये काढून त्याचे ई-चालान फाडले.काय आहे ई-चालानमध्येवाहनचालकास पकडल्यानंतर ई-चालान यंत्रात वाहनाचा क्रमांक, वाहनचालकाचे लायसन्स क्रमांक, संपूर्ण नाव, पत्ता, वाहतूक नियम मोडल्याचे ठिकाण, वेळ आणि तारीख याबाबतची माहिती वाहतूक पोलीस नोंदवतील. त्यानंतर ही माहिती ई-चालान सॉफ्टवेअरमध्ये कायमस्वरूपी साठवून ठेवली जाईल. परिणामी वाहतूक नियम मोडणाºया वाहनचालकाने किती वेळा नियम मोडले हे एका क्लीकवर पोलिसांना दिसणार आहे.

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसtraffic policeवाहतूक पोलीस