शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

न्यायदानाच्या प्रक्रियेमध्ये होणारा विलंब हा अतिशय घातक प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 13:24 IST

मुख्य न्यायमूर्ती नंद्राजोग यांचे मार्गदर्शन

ठळक मुद्देघटनेचे शिल्पकार डॉ. आंबेडकरांचा वारसा चालवावा

औरंगाबाद : न्यायदान प्रक्रियेत विलंब होणे हे अतिशय घातक आहे. हा एक प्रकारे अन्याय करणे होय. यावर न्यायाधीश आणि विधिज्ञांनी एकत्रितपणे मार्ग काढणे आवश्यक आहे. न्यायदानाचे काम जलद गतीने कसे होईल, याची खबरदारी घेतली पाहिजे. कायदेमंडळानेही याबाबत भरीव योगदान दिले पाहिजे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्राजोग यांनी औरंगाबाद खंडपीठात बोलताना व्यक्त केले. 

मुख्य न्यायमूर्ती नंद्राजोग एक आठवड्याच्या न्यायिक कामकाजासाठी येथे आले होते. याचे औचित्य साधून खंडपीठ वकील संघातर्फे गुरुवारी (दि.२६) त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंचावर खंडपीठातील वरिष्ठ न्यायमूर्ती प्रसन्न वराळे, वकील संघाच्या अध्यक्ष अ‍ॅड. सुरेखा महाजन आणि सचिव अ‍ॅड. शहाजी घाटोळ पाटील उपस्थित होते. मुख्य न्या. नंद्राजोग पुढे म्हणाले की, सध्याच्या इंटरनेटच्या युगात अत्याधुनिक बाबींचा वापर करून न्यायिक क्षेत्रात बदल घडवून न्यायदान करणे गरजेचे आहे. वकिलांनी न्यायनिवाडे सादर करून निकाल प्रभावीपणे देण्यास सहकार्य करावे. नवीन वकिलांनी प्रकरणे सादर करताना परिस्थितीची योग्य प्रकारे मांडणी करावी. 

न्या. वराळे म्हणाले की, मुख्य न्यायमूर्ती हे ज्ञानी व तपस्वी व्यक्तिमत्त्व आहेत. न्यायिक क्षेत्रातील सर्व शाखांत त्यांचे प्रभुत्व आहे. त्यांची कामकाजाची पद्धत वाखाणण्याजोगी आहे. त्यांचा आदर्श घेऊन सर्व न्यायमूर्ती आणि वकिलांनी त्यांचे काम प्रभावीपणे करावे. अ‍ॅड. महाजन यांनी प्रास्ताविकात वकिलांचे विविध प्रश्न, खंडपीठ परिसरातील पार्किंगची सुविधा, वकिलांचे चेम्बर्स आदी भौतिक सोयी-सुविधांकरीता निधीची मागणी केली, तसेच अंतर्गत रस्ते, जलवाहिन्या, पाणीपुरवठा, अखंड वीजपुरवठा आणि इलेक्ट्रिक फीडर आदी सुविधा पुरविण्याचीही मागणी केली. अ‍ॅड. अनघा पेडगावकर यांनी सूत्रसंचालन केले, तर सचिव शहाजी घाटोळ पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी वकील संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. 

घटनेचे शिल्पकार डॉ. आंबेडकरांचा वारसा चालवावामहाराष्ट्रास राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा लाभला आहे. त्यांच्या न्यायिक तत्त्वांचे सर्वांनी पालन करावे व त्यांचा वारसा सर्वांनी अखंडपणे चालवावा. समानता, बंधुता आणि व्यक्ती स्वातंत्र्य या मूलतत्त्वांची अंमलबजावणी होईल, याची दक्षता सर्वांनी घ्यावी आणि समाजाला नवी दिशा देण्याचे काम करण्याचे आवाहन मुख्य न्यायमूर्ती नंद्राजोग यांनी केले.

टॅग्स :Courtन्यायालयAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी