शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान केअर फंडातून औरंगाबादेस आलेले व्हेंटिलेटर्स निकृष्ट दर्जाचे, जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 07:41 IST

किती व्हेंटिलेटर वापरात आहेत, किती बाहेरच्या जिल्ह्यात दिले आहेत, नादुरुस्त किती आहेत, याचा अहवाल तयार करण्याचे काम प्रशासनाने सोमवारी ताबडतोब हाती घेतले आहे.

  औरंगाबाद: पंतप्रधान केअर फंडातून औरंगाबाद जिल्ह्यासाठी आलेले व्हेंटिलेटर निकृष्ट दर्जाचे असल्याचा खळबळजनक आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी सोमवारी केला. त्याला प्रत्युत्तर देत खासदार डॉ. भागवत कराड यांनीही पुराव्यानिशी आरोप करण्याची मागणी केली. दोन्ही खासदारांच्या व्हेंटिलेटरवरून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांत प्रशासनाची मात्र कोंडी झाली.किती व्हेंटिलेटर वापरात आहेत, किती बाहेरच्या जिल्ह्यात दिले आहेत, नादुरुस्त किती आहेत, याचा अहवाल तयार करण्याचे काम प्रशासनाने सोमवारी ताबडतोब हाती घेतले आहे. जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये सोमवारी कोरोना नियंत्रण आणि उपाययोजनांबाबत बैठक झाली. यावेळी खासदार जलील म्हणाले, पंतप्रधान साहाय्यता निधीतून मिळालेल्या व्हेंटिलेटर्सचा पूर्ण क्षमतेने वापर होत नाही. ते व्हेंटिलेटर नादुरुस्त झाल्यामुळे निकृष्ट दर्जाचे आहेत, असे वाटू लागले आहे.खासदार जलील यांच्या आरोपामुळे संतप्त झालेले भाजप खासदार कराड, आमदार अतुल सावे हे प्रत्युत्तर देताना यावेळी म्हणाले, तंत्रज्ञ बोलावून व्हेंटिलेटर्स तपासण्यात येतील. तसेच केंद्रीय आरोग्य विभागाचे सहसचिव राजेशभूषण यांनादेखील याप्रकरणी बोलून व्हेंटिलेटरसाठी असलेली एसओपी मागविलेली आहे.

केंद्राने दिले सुमारे २० कोटींचे व्हेंटिलेटर्सगेल्यावर्षी केंद्र सरकारने जिल्ह्यासाठी १०० व्हेंटिलेटर्स दिले होते. त्यातील ६० हून अधिक व्हेंटिलेटर्स बिघडले होेते, ते प्रशासनाने दुरुस्त करून घेतल्याचा दावा प्रशासन करीत आहे. दुसऱ्या लाटेतही केंद्राकडून जिल्ह्याला पुन्हा १०० व्हेंटिलेटर्स देण्यात आले. त्यातील ५५ व्हेंटिलेटर्स परभणी, हिंगोली आणि बीड जिल्ह्याला देण्यात आले आहेत. १० लाख याप्रमाणे २० कोटींचे हे व्हेंटिलेटर्स आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबादNarendra Modiनरेंद्र मोदी