अवैध जनावरांची वाहतुक करणारे वाहन पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:04 IST2021-03-01T04:04:27+5:302021-03-01T04:04:27+5:30

लासूर स्टेशन : अवैधरित्या छोट्या टेम्पोमध्ये कोंबून गायींची वाहतूक करणाऱ्याला सजग नागरिकाने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. दिवशी पिपळगाव ते ...

Vehicles transporting illegal animals were seized | अवैध जनावरांची वाहतुक करणारे वाहन पकडले

अवैध जनावरांची वाहतुक करणारे वाहन पकडले

लासूर स्टेशन : अवैधरित्या छोट्या टेम्पोमध्ये कोंबून गायींची वाहतूक करणाऱ्याला सजग नागरिकाने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

दिवशी पिपळगाव ते कसाबखेडा दरम्यानच्या गायरानाजवळ सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान एका छोट्या टेम्पोत (एमएच २० ईएल ३९४८)मध्ये अवैधरित्या कोंबून सहा गाई व एक बैल यांना नेले जात होते. येथील सजग नागरिक योगेश जाधव यांनी या वाहनचालकाला वाहनासह थेट लासूर स्टेशन येथील पोलीस चौकीत आणले. पोलिसांनी वाहन व जनावरे जप्त करुन जनावरांना सत्य अहिंसा गोशाळेत पाठवले. याप्रकरणी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सतीश दिंडे, पोलीस काॅन्स्टेबल संतोष गिरी, बीट अंमलदार कैलास राठोड करत आहेत.

फोटो : याच वाहनातून जनावरांना कोंबून नेले जात होते.

280221\img_20210228_202638_1.jpg

याच वहनात जनावरांना कोंबून नेले जात होते.

Web Title: Vehicles transporting illegal animals were seized