शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
2
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
3
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली TATAची नवी कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
4
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
5
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
6
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!
7
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
8
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा
9
पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...
10
पती झोपेत, चालत्या ट्रेनमधून पत्नी गायब; तीन दिवसांनी दिराला आला एक मेसेज अन् सासर हादरलं! नेमकं काय झालं?
11
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
12
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव
13
IND vs PAK: आशिया कप मॅच रेफरीला हटवा! पाकिस्तानची ICCकडे धाव, हस्तांदोलन प्रकरण जिव्हारी
14
Urban Company IPO तुम्हाला लागलाय का, कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
15
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
16
होय... ५० हजारांच्या पगारात २ कोटींचा फंड शक्य आहे! फोलो करा ५०-३०-१०-१० चा गुंतवणूक फॉर्म्युला
17
भय इथले संपत नाही! मंकीपॉक्सनंतर नव्या व्हायरसचं संकट; 'ही' आहेत लक्षणं, 'या' लोकांना धोका
18
7 वर्षांच्या वॉरंटीसह Royal Enfield ने लॉन्च केली नवीन Meteor 350; GST कपातीनंतर किंमत फक्त...
19
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
20
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले

काय खाताय, बघा नीट! शहागंज भाजी मंडईत उकिरड्यावर विकला जातोय भाजीपाला

By प्रशांत तेलवाडकर | Updated: May 23, 2024 16:34 IST

तुम्ही उकिरड्यावरच्या भाज्या खाता का ? मग नक्कीच आजारी पडाल

छत्रपती संभाजीनगर : तुम्ही उकिरड्यावरची भाजी खाता का? असा प्रश्न तुम्हाला विचारला तर तुम्हाला धक्काच बसेल. अहो, शहागंज भाजी मंडईत उकिरड्यावर भाजीपाला विकला जातोय. सडलेले फळ भाजीपाला व हॉटेलमधील कुजलेले अन्नपदार्थ आणून टाकले जाते व त्याच्या बाजूला भाजीपाला विकला जात आहेत. भाज्यांवरून हात फिरविला की, हजारो माश्या घोंगावत उडतात. अशी अवस्था असूनही ग्राहक येथून भाजीपाला खरेदी करतात हेही विशेष.

शहागंजमध्ये पूर्वी भाजीपाल्याचा अडत बाजार भरविल्या जात होता. १९९७ मध्ये येथील अडत बाजार जाधववाडी मार्केट यार्डमध्ये स्थानांतरित करण्यात आला आणि तेथील गाळ पाडण्यात आली. त्याच वेळी मॉडर्न मार्केटच्या नावाखाली महानगरपालिकेने भाजी मंडई उद्ध्वस्त केली. येथे २०१२ पासून होलसेल मार्केटच्या ढिगाऱ्यावर भाजी मंडई भरत आहे. जिथे जागा मिळेल तिथे बस्तान मांडून विक्रेते भाज्या विकत आहेत. जागा नसल्याने अखेर अनेक विक्रेते उकिरड्यालगतच भाज्या विकत आहेत. 

या उकिरड्यावर मनपातर्फे दररोज ओला व सुका कचरा साफ केला जातो, पण सडलेल्या पालेभाज्या फेकून दिला जातो. आसपासचे हॉटेलवाले कुजलेले अन्नपदार्थ येथेच आणून टाकतात. यामुळे दिवसभर येथे चिलटे, माश्यांचा प्रादुर्भाव असतो. त्याच माश्या मग आसपासच्या हातगाड्यांवरील भाज्यांवर जाऊन बसतात. हातगाडीवरील भाज्यांवर नुसता वरून हात फिरविला की, हजारो चिल्टे, माश्या उडतात एवढी घाण परिस्थिती तेथे आहे. उकिरड्यावर दुर्गंधीही असतेच, ग्राहक नाकाला रुमाल बांधून येथे पालेभाज्या खरेदी करताना दिसून आले.

स्वस्त टोमॅटोमुळे दुर्गंधीकडे दुर्लक्षभाजी मंडई परिसरात गावरान टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात झाली होती. या टोमॅटोवरही माश्या घोंगावत होत्या, पण १० रुपये किलोने टोमॅटो तेही गावरान मिळत असल्याने ग्राहक दुर्गंधी सहन करीत टोमॉंटो खरेदी करीत होते.

आम्ही माणसं आहोत याचा मनपाला विसरमागील १५ वर्षांपासून मी येथे भाजी विकते. जागा मिळत नसल्याने उकिरड्याच्या बाजूला बसून भाज्या विकते. पोटासाठी उकिरड्यावर दुर्गंधी सहन करत बसावेच लागते. पण, आम्ही माणसं आहोत याचा मनपाला विसर पडला आहे. यामुळेच कचरा वेळेवरच उचलला जात नाही.-करिमा पठाण, ज्येष्ठ भाजी विक्रेत्या

हॉटेलवाल्यांचे कुजलेले अन्नपदार्थ उकिरड्यावरमनपाचे सफाई कर्मचारी सकाळी येऊन कचरा साफ करून जातात. पण, सकाळी १० वाजेनंतर आसपासचे हॉटेलवाले त्यांच्याकडील कुजलेले अन्नपदार्थ येथे उकिरड्यावर आणून टाकतात. भाजीपालावाले त्यांच्यकडील खराब झालेले कांदे, बटाटे आदी फळभाज्या येथेच फेकून दिले जातात.- सलीम बागवान

अन्नपदार्थ, कॅरिबॅग जनावरांच्या पोटातशहागंज भाजी मंडईतील उकिरड्यावर मोठ्या प्रमाणात जनावरांचा वावर असतो. त्यात गायीची संख्या अधिक असते. कॅरिबॅगसह कुजलेले अन्नपदार्थ त्या खाऊन टाकतात.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarketबाजार