शिवजन्मोत्सवानिमित्त गुरुवारपासून विविध कार्यक्रम

By Admin | Published: February 6, 2017 11:08 PM2017-02-06T23:08:59+5:302017-02-06T23:11:46+5:30

उस्मानाबाद : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त उस्मानाबाद येथे मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने गुरूवारपासून विविध कार्यक्रम होणार आहे

Various programs from Thursday to celebrate Shivjanmotsav | शिवजन्मोत्सवानिमित्त गुरुवारपासून विविध कार्यक्रम

शिवजन्मोत्सवानिमित्त गुरुवारपासून विविध कार्यक्रम

googlenewsNext

उस्मानाबाद : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त उस्मानाबाद येथे मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने गुरूवारपासून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष बलराज रणदिवे यांनी दिली़
शहरातील लेडीज क्लबच्या प्रांगणात गुरूवापासून या महोत्सवास प्रारंभ होत आहे़ नऊ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता व्याख्याते निलेश जगताप (पुणे) यांचे ‘ढाल तलवारीच्या पलिकडचे शिवराय व शंभूराजे’ या विषयावर व्याख्यान होणार असून, याचे उद्घाटन धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ़ प्रतापसिंह पाटील यांच्या हस्ते होणार आहे़शुक्रवारी ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ हा हास्यविनोदी कार्यक्रम, शनिवारी शिवशाहीर राजेंद्र कांबळे (अकलूज) यांचा पोवाड्याचा कार्यक्रम रंगणार असून याच कार्यक्रमात सामाजिक बांधिलकी म्हणून अंध मुलांना १०० काठी (स्टिक) चे वाटप प्रहार संघटना व मध्यवर्ती शिवजयंती समितीच्या वतीने करण्यात येणार आहे़ रविवार दि. १२ फेब्रुवारी रोजी प्रवीण गायकवाड (पुणे) यांचे ‘छत्रपती शिवराय ते छत्रपती शाहू महाराज-प्रेरणा’ या विषयावर व्याख्यान, १३ रोजी ‘गारवा’फेम गायक आणि संगीतकार मिलिंद इंगळे यांचा गप्पा व गाण्याचा कार्यक्रम होणार आहे.
१४ रोजी ‘शिवकालीन चित्रकला’ यावर जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा तर १५ फेब्रुवारी रोजी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे़ १७ रोजी प्रा़ मनोहर भोळे यांचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व चर्चासत्र होणार असून, १८ रोजी शहरातून शोभायात्रा काढण्यात येणार आहे़ रविवार दि. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास माजी गृहमंत्री डॉ़ पद्मसिंह पाटील यांच्या हस्ते महाअभिषेक करण्यात येणार असून, सकाळी ९़३० वाजता माजी आ़ ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या हस्ते शिवमूर्तीचे पूजन होणार आहे़ याच दिवशी सायंकाळी ४ वाजता शिवजन्मोत्सवानिमित्त मिरवणूक काढण्यात येणार आहे़ याचा शुभारंभ आ़ राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते होईल. (प्रतिनिधी)

Web Title: Various programs from Thursday to celebrate Shivjanmotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.