शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरहून ८२५ रिकाम्या सीट घेऊन धावली नांदेडला पळवलेली वंदे भारत एक्स्प्रेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 16:43 IST

नांदेडला पळविलेल्या रेल्वेची पहिली नियमित फेरी; नव्या वेळेच्या संदेशाअभावी प्रवाशांची दमछाक

छत्रपती संभाजीनगर : नांदेडला पळविलेल्या जालना - मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसची गुरुवारपासून नियमित फेरी सुरू झाली. मात्र, बदललेली वेळ प्रवाशांसाठी गैरसोयीची झाल्याचे पहिल्याच नियमित फेरीत स्पष्ट झाले. काही मोजकेच प्रवासी छत्रपती संभाजीनगरहून रवाना झाले. तब्बल ८२५ रिकाम्या सीट घेऊन ही रेल्वे छत्रपती संभाजीनगरहून रवाना झाली.

जालन्याहून धावताना ही रेल्वे पूर्वी छत्रपती संभाजीनगरहून सकाळी ५:५० वाजता सुटत होती आणि दुपारी ११:५५ वाजेपर्यंत मुंबईला पोहोचत होती. आता ही रेल्वे नांदेडला पळविल्यानंतर नव्या वेळापत्रकानुसार छत्रपती संभाजीनगरहून सकाळी ८:१५ वाजता सुटेल आणि दुपारी २:२५ वाजता मुंबईला पोहोचेल. त्यामुळे सकाळी मुंबईला गेल्यानंतर सायंकाळी रेल्वेने परतणे अशक्य आहे. ‘वंदे भारत’ची अवस्था ‘जनशताब्दी’प्रमाणे होईल आणि प्रवाशांसाठी ती उपयोगी ठरणार नाही. नांदेडहून धावणाऱ्या पहिल्या नियमित फेरीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्येही, ही रेल्वे आता गैरसोयीची झाल्याचीच चर्चा सुरू होती. अनेक दिवसांपूर्वी बुकिंग करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेची वेळ बदलल्याचे संदेशही आले नाहीत. त्यामुळे अनेक प्रवासी सकाळी ५:५० वाजेपूर्वीच स्टेशनवर दाखल झाले होते. रेल्वे ८:१५ वाजता सुटणार असल्याचे कळताच काही जण परत गेले, तर काही जण स्टेशनवरच थांबले.

मुंबईत मुक्कामाची वेळवंदे भारत एक्स्प्रेस नांदेडपर्यंत नेल्याने कनेक्टिव्हिटी वाढली. पण, छत्रपती संभाजीनगरकरांसाठी ही रेल्वे गैरसोयीची झाली आहे. एका दिवसात मुंबईला ये-जा करणे अशक्य होईल. मुंबईत मुक्काम करण्याचीच वेळ येईल. बदललेल्या वेळेचा रेल्वेकडून मेसेज आला नाही. त्यामुळे मी सकाळी ५:५० वाजता स्टेशनवर येऊन परत गेलो.- अक्षय पाटील, प्रवासी

जास्त पैसे देऊन गैरसोय विकतवंदे भारत एक्स्प्रेसची वेळ बदलल्याने आता जास्त पैसे देऊन गैरसोय विकत घेतल्यासारखी परिस्थिती झाली आहे. विविध कामांसाठी मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही रेल्वे आता गैरसोयीची झाली आहे.- ॲड. सुयश जांगडा, प्रवासी

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरNandedनांदेड