शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

वाल्मीस मावेजाची ९३ कोटी रक्कम अदा केली नाही; ‘एनएचएआय’च्या संपत्ती जप्तीचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 14:35 IST

एकत्रित १०२ कोटी ५४ लाख रुपयांपेकी केवळ ७.६४ कोटी रुपये अदा करण्यात आले. इतर रक्कम देण्यास एनएचआयएने टाळाटाळ केली.

छत्रपती संभाजीनगर : जल व भूव्यवस्थापन संस्थेच्या (वाल्मी) जागेच्या अधिग्रहणाच्या ९३ कोटींच्या मावेजाची रक्कम अदा केली नाही म्हणून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची (एनएचआयए) चल संपत्ती जप्त करण्याचे आदेश जिल्हा न्यायाधीश सुभाष कऱ्हाळे यांनी दिले. अधिग्रहणापोटी १०२ कोटी ५४ लाख ७८ हजार १७२ रुपये मावेजा देण्याचा ‘अवाॅर्ड’ घोषित करण्यात आला होता.

एनएचआयची टाळाटाळधुळे-सोलापूर महामार्ग चौपदरीकरणात वाल्मीची मालमत्ता बाधित झाली. काही गटातील जमिनीसाठी ५५०० रुपये प्रति चौ.मी., तर काही जागेसाठी १३३०० रु. प्रति चौ.मी. मावेजा देण्याचे भूसंपादन अधिकाऱ्यांनी घोषित केले. एकत्रित १०२ कोटी ५४ लाख रुपयांपेकी केवळ ७.६४ कोटी रुपये अदा करण्यात आले. इतर रक्कम देण्यास एनएचआयएने टाळाटाळ केली.

व्याजासह मावेजा अदा कराएनएचआयने लवादामध्ये भूसंपादन अधिकाऱ्याने घोषित केलेल्या ‘अवाॅर्ड’ला आव्हान दिले. वाल्मी शासन अंगीकृत संस्था असल्याने मोबदला देण्याची गरज नसल्याचे लवादात सांगितले. लवादाने १७ एप्रिल २०१८ रोजी भूसंपादन अधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवला. प्रकरण विलंब माफी अर्जाच्या सुनावणीसाठी प्रलंबित आहे. मावेजाची उर्वरित रक्कम ९३ कोटी १३ लाख रुपये व्याजासह अदा करावी यासाठी ‘वाल्मी’च्या वतीने ॲड. अण्णासाहेब मुळे (शेकटेकर) यांनी जिल्हा न्यायालयात अर्ज केला. न्यायालयाने अर्ज मंजूर करीत एनएचआयएची मालमत्ता जप्त करण्याचे आदेशित दिले. वाल्मीचे सहसंचालक सुभाष कापघते व निवृत्त कर्मचारी अविनाश मुळे यांनी पाठपुरावा केला. घोषित ‘अवाॅर्ड’ची रक्कम २०१८ पासून व्याजासह द्यावी अशी विनंती ‘वाल्मी’च्या वतीने ॲड. अण्णासाहेब मुळे यांनी केली.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरHigh Courtउच्च न्यायालयhighwayमहामार्ग