शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
5
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
6
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
7
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
8
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
9
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
10
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
11
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
12
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
13
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
14
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
15
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
16
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
17
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
18
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
19
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
20
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी

वाल्मीच्या संचालकांकडे कोटींचे घबाड  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 5:19 AM

प्राध्यापकावर निलंबनाची कारवाई न करण्यासाठी त्यांच्याकडून दहा लाखांची लाच घेतल्याप्रकरणी रंगेहाथ पकडलेले जल आणि भूमी व्यवस्थापन संस्थेचे (वाल्मी) महासंचालक हरिभाऊ गोसावी आणि सहसंचालक राजेंद्र क्षीरसागर यांचे पुण्यातील उच्चभू्र वसाहतीत कोट्यवधी रुपये किमतीचे बंगले आणि बँकांमध्ये लॉकर असल्याचे समोर आले.

औरंगाबाद : प्राध्यापकावर निलंबनाची कारवाई न करण्यासाठी त्यांच्याकडून दहा लाखांची लाच घेतल्याप्रकरणी रंगेहाथ पकडलेले जल आणि भूमी व्यवस्थापन संस्थेचे (वाल्मी) महासंचालक हरिभाऊ गोसावी आणि सहसंचालक राजेंद्र क्षीरसागर यांचे पुण्यातील उच्चभू्र वसाहतीत कोट्यवधी रुपये किमतीचे बंगले आणि बँकांमध्ये लॉकर असल्याचे समोर आले.गोसावी यांचे पुण्यातील शिवाजीनगर येथे तर क्षीरसागर यांचा सिंहगड सिटीमध्ये आलिशान बंगला असल्याचे चौकशीत समोर आले. या बंगल्यांची किंमत कोट्यवधी रुपये आहे. शिवाय उभयतांची पुणे येथील बँकांमध्ये लॉकर आहेत. त्याची तपासणी केली जाणार आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक वर्षाराणी पाटील यांनी सांगितले की, वाल्मीचे महासंचालक आणि जलसंधारण आयुक्तालयाचे आयुक्त अशी दोन पदे गोसावी सांभाळत होते. क्षीरसागर हे अधीक्षक अभियंता दर्जाचे अधिकारी असून, ते सहसंचालकपदी कार्यरत आहेत.गोसावी यांच्या बंगल्यात सध्या कोणीही नसल्याने तेथे पोलीस गार्ड लावण्यात आला, तर क्षीरसागरच्या बंगल्याची झडती एसीबीचे अधिकारी घेणार आहेत. गोसावी बंगल्यांची नंतर झडती होणार आहे़अधिका-याचे नांदेडला घरशेतक-याकडे ५० हजार रुपये लाचेची मागणी करून स्वीय सहायकामार्फत दहा हजार रुपये लाच घेतल्याप्रकरणी पकडण्यात आलेले सिल्लोडचे उपविभागीय अधिकारी अनिल माचेवाड यांच्या नांदेड येथील घराची झडती घेण्यासाठी त्यास सोबत घेऊन पोलीस नांदेडला गेले आहेत.

टॅग्स :black moneyब्लॅक मनी