शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

"स्मृती विरली तरी प्रीत उरली!" स्मृतिभ्रंश झालेल्या आजोबांसाठी आजींची अढळ निष्ठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 19:40 IST

शब्दांविना संवाद आणि सुरकुतलेल्या हातांची साथ; 'व्हॅलेंटाईन डे'चा खरा अर्थ या ज्येष्ठ जोडप्यांकडून शिका.

- प्राची पाटीलछत्रपती संभाजीनगर : ‘तो शून्यात हरवलेला... त्याला तिची ओळखही उरलेली नाही. तिच्या ‘अहो’ या हाकेलाही त्याच्याकडून ‘ओ’ मिळत नाही. तासनतास तो एकाच दिशेला निर्विकार बघत असतो; पण ती त्याला वाऱ्यावर सोडत नाही. सावलीसारखी कायम त्याच्या पाठीशी उभी राहते. उन्हाला बसल्यावर त्याचा सुरकुतलेला, थरथरणारा हात आपल्या ओंजळीत घेते आणि सुरू होतो आठवणींचा प्रवास... ती लग्नाचे किस्से सांगते, जुन्या दिवसांत रमते. त्याला यातलं काही समजत नाही, हे तिलाही ठाऊक असतं; पण अचानक, जेव्हा त्याच्या डोळ्यांत तिला ओळखीची पुसटशी चमक दिसते, तेव्हा त्याच्या चमकणाऱ्या डोळ्यांच्या ती पुन्हा एकदा प्रेमात पडते. डोळ्यांच्या कडांत दाटलेलं पाणी प्रयत्नाने अडवते आणि आपल्या जोडीदाराचा हात आणखी घट्ट पकडून ठेवते.

आयुष्याच्या संध्याकाळी, जेव्हा शब्द संपतात आणि आठवणी धूसर होतात, तेव्हा ‘स्पर्श’ बोलू लागतो. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने ‘लोकमत’ने जेव्हा ‘स्नेहसावली केअर सेंटर’ला भेट दिली असता कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या ‘प्रेम म्हणजे वणवा नव्हे, त्या तर असतात संथ वाहणाऱ्या दोन पणत्या’ या ओळींचा जिवंत प्रत्यय आला.

- ‘ती’ सावलीसारखी सोबत...विमला आजी आणि रामराव आजोबा (नाव बदललेले) यांच्या लग्नाला ६० वर्षे लोटली. ८२ वर्षीय आजोबांना स्मृतिभ्रंशामुळे पत्नीचीही ओळख पटत नाही; पण आजी खचल्या नाहीत. ‘लोकमत’शी बोलताना आजींनी त्यांच्या लग्नाविषयी सांगितले. ‘लग्न झाल्यानंतर यांना मी प्रथम पाहिले. आमच्यात कधी फार भांडणे झाली नाहीत; पण एक खंत आहे, लग्नानंतर हे नोकरीच्या गावी आणि मी सासरी पानोडला. यांच्यासोबत जास्त राहता आलं नाही. आता त्यांचा सहवास शेवटपर्यंत मिळावा.’

- वर्षभरानंतर ‘रोझ डे’ला पुनर्भेटदुसरी कहाणी आहे १९६५ मध्ये विवाह झालेल्या राधाबाई आणि गोविंदरावांची. संकटात पत्नीची ढाल बनून उभे राहणारे आजोबा, पत्नीला अर्धांगवायूचा झटका आल्यावर कोलमडले. ‘स्नेहसावली’त पत्नीसोबत ते राहत. दुर्दैवाने मुलाने कामासाठी त्यांना गावी नेले आणि तिथे अपघाताने त्यांची ताटातूट केली. तब्बल १ वर्षानंतर, बरोबर ‘रोझ डे’च्या दिवशी त्यांची ‘स्नेहसावली’त पुन्हा भेट झाली. ते अजूनही अंथरुणावर आहेत. आजी त्यांच्या बाजूला बसून गप्पा मारत असतात. पतीच्या प्रेमळ तक्रारी करताना राधाबाईंच्या चेहऱ्यावर समाधान दिसते. उखाणा घेताना त्यांच्या चेहऱ्यावर आजही लज्जेचे भाव उमटतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Love Endures Despite Memory Loss: Wife's Devotion to Husband

Web Summary : Despite her husband's memory loss, an 82-year-old woman's unwavering love shines. Another couple, separated by circumstance, reunited after a year. Their stories, witnessed at a care center, exemplify enduring love and devotion in twilight years, where touch speaks volumes.
टॅग्स :Valentine Dayव्हॅलेंटाईन्स डेchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर