वैजापूर (छत्रपती संभाजीनगर): वैजापूर नगरपरिषदेच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक यश संपादन केले आहे. नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत भाजपचे डॉ. दिनेश परदेशी यांनी ६,२८८ मतांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवत वैजापूरची सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. त्यांनी शिंदे शिवसेनेचे उमेदवार आणि विद्यमान आमदार रमेश बोरनारे यांचे सख्खे बंधू संजय बोरनारे यांचा पराभव केला.
बोरनारे यांच्यासाठी मोठा राजकीय धक्काआमदार रमेश बोरनारे यांनी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती. मात्र, मतदारांनी डॉ. दिनेश परदेशी यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केल्याने बोरनारे कुटुंबासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
पक्षनिहाय बलाबलनगराध्यक्षपदासह नगरसेवक पदाच्या २५ जागांसाठी झालेल्या मतदानात संमिश्र कल पाहायला मिळाला. यामध्ये भाजपने सर्वाधिक ११ जागांवर विजय मिळवला आहे. तर शिवसेनेने (शिंदे गट) १० आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) ४ जागा पटकावल्या आहेत. जरी नगराध्यक्ष भाजपचा असला, तरी सभागृहात सत्तेसाठी इतर मित्रपक्षांची मदत महत्त्वाची ठरणार आहे.
प्रभागनिहाय विजयी उमेदवारांची यादी:नगराध्यक्ष: डॉ. दिनेश परदेशी, भाजपाप्रभाग १- पारस घाटे, सुमैया बक्ष शिवसेना, भाजपाप्रभाग २- मोनाली खैरे, विशाल संचेती भाजपा, भाजपाप्रभाग ३- पूजा त्रिभुवन, रियाज अकील शेख राष्ट्रवादी, राष्ट्रवादीप्रभाग ४- स्वप्नील जेजुरकर, संगीता राजपूत शिवसेना, भाजपाप्रभाग ५- जयश्री चौधरी, साबेर खान, शिवसेना, शिवसेनाप्रभाग ६- दीपा राजपूत, ताहेर साबेर खान, भाजपा, शिवसेनाप्रभाग ७- राहुल त्रिभुवन, सविता चव्हाण, शिवसेना, भाजपाप्रभाग ८- बाबासाहेब पुतळे, लता वाणी, शिवसेना, भाजपाप्रभाग ९- अमिर अली सैय्यद, सुरेखा घाटे, शिवसेना, शिवसेनाप्रभाग १०- ज्योती जोशी, शे. हमीद कुरेशी भाजपा, शिवसेनाप्रभाग ११- दशरथ बनकर, सुवर्णा ठोंबरे, भाजपा, राष्ट्रवादीप्रभाग १२- राजेश गायकवाड, जयश्री राजपूत, कविता शिंदे भाजपा (तीन्ही)
Web Summary : BJP's Dinesh Pardeshi won Vaijapur's Nagaradhyaksha election, defeating Shiv Sena (Shinde) candidate Sanjay Boranare. BJP secured 11 seats, Shinde Sena 10, and NCP (Ajit Pawar) 4. A mixed mandate calls for coalition politics.
Web Summary : वैजापूर नगर निकाय चुनाव में भाजपा के दिनेश परदेशी ने शिंदे सेना के संजय बोरनारे को हराया। भाजपा को 11, शिंदे सेना को 10 और राकांपा (अजित पवार) को 4 सीटें मिलीं। गठबंधन की राजनीति महत्वपूर्ण होगी।