शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: राज्यात मतदानाला सुरुवात, मतदारांची केंद्रांवर गर्दी
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
5
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
6
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
7
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
8
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
9
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
10
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
11
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
12
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
13
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
14
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
15
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
16
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
17
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
18
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
19
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
20
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

अवघी वैजापूरनगरी साईचरणी लीन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 12:31 AM

दरवर्षाप्रमाणे यंदाही श्री साईभक्त बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या ‘साईची वारी, शिर्डीच्या दारी’ या उपक्रमांतर्गत शहरातील १५ हजार साईभक्तांनी वैजापूर ते शिर्डी पायी दिंडीमध्ये सहभाग नोंदवत गेल्या नऊ वर्षांचा विक्रम मोडला. त्यामुळे गुरुवारी मध्यरात्रीपासून संपूर्ण रस्त्यावर सार्इंचाच जयघोष ऐकू आला. शहरातील १५ हजार भाविक शिर्डीत असल्यामुळे गुरुवारी वैजापूरनगरीत शुकशुकाट जाणवला.

मोबीन खान ।लोकमत न्यूज नेटवर्कवैजापूर : दरवर्षाप्रमाणे यंदाही श्री साईभक्त बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या ‘साईची वारी, शिर्डीच्या दारी’ या उपक्रमांतर्गत शहरातील १५ हजार साईभक्तांनी वैजापूर ते शिर्डी पायी दिंडीमध्ये सहभाग नोंदवत गेल्या नऊ वर्षांचा विक्रम मोडला. त्यामुळे गुरुवारी मध्यरात्रीपासून संपूर्ण रस्त्यावर सार्इंचाच जयघोष ऐकू आला. शहरातील १५ हजार भाविक शिर्डीत असल्यामुळे गुरुवारी वैजापूरनगरीत शुकशुकाट जाणवला.सार्इंच्या गजरात तल्लीन झालेल्या वैजापूरकरांमुळे शहराला शिर्डीची शोभा आली होती. वृक्षलागवड, स्वच्छता, पर्यावरण असे विविध विषय हाती घेऊन वारकरी संप्रदायासोबत माळकरी आणि टाळकरी विद्यार्थीही दिंडीमध्ये सहभागी झाले होते. दरम्यान, नयनरम्य पालखी सोहळ्याने वैजापूरकरांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.टाळ-मृदंगामुळे वातावरणात साईंचाच गजर ऐकू येत होता. विविध राजकीय आणि सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत वारकºयांच्या सेवेसाठी रस्त्यावर स्टॉल लावले होते. पहाटे चार वाजता शहरातील महादेव मंदिरापासून साईबाबांच्या पालखीसह शिर्डी दिंडीस सुरुवात झाली.यावेळी माजी नगराध्यक्षा शिल्पा परदेशी, संस्थेचे अध्यक्ष विशाल संचेती, कैलास साखरे, योगिता साखरे, राजेंद्र लालसरे, रेवती लालसरे, आशाबाई आगळे, प्रशांत गायकवाड, नितीन लुनावत, शुभम् लालसरे, मनोज दौडे व सुधीर लालसरे यांच्या हस्ते पालखीची पूजा करण्यात आली.नागपूर-मुंबई महामार्गावरील आठ तासांच्या प्रवासादरम्यान वैजापूर पालिका, साईभक्त, महादेव मित्र मंडळ व इतर संस्थांच्या वतीने दिंडीतील भाविकांसाठी चहा, नाश्ता व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. गुरुवारी दुपारी एक वाजता दिंडी शिर्डीत पोहोचल्यानंतर या भाविकांसाठी साई संस्थानने दर्शनाची व्यवस्था केली होती.च्पहाटे चार वाजता शहरातील महादेव मंदिरापासून साईबाबांच्या पालखीसह शिर्डी दिंडीस सुरुवात झाली. तब्बल ४२ कि.मी. अंतर आठ ते नऊ तासात पूर्ण करण्यात आले. पालखी वैजापुरातून जाणार म्हणून रस्ते झाडून पुसून स्वच्छ केले होते. पालखी मार्गावर सडासारवण-रांगोळ्या काढल्याने वातावरण भक्तिमय झाले होते. बेलगाव, सटाणा, कोपरगावमार्गे दुपारी एक वाजता साईभक्त शिर्डीला पोहोचले.कोट्यवधींची उलाढाल थांबलीगुरुवारी शहरातील व्यापारी प्रतिष्ठाने, शैक्षणिक संस्था, छोट्या दुकानांसह संपूर्ण बाजारपेठ जवळपास बंद असल्याचे दिसले. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल थांबली. विशेष म्हणजे व्यापाºयांनी स्वत:हून दुकाने बंद ठेवून पायी दिंडीत सहभाग नोंदविला.नजर जाईल तिथपर्यंत भक्तसागरच्पायी दिंडीत दहा वर्षांपासून ते सत्तर वर्षे वयोगटातील भाविक सहभागी झाले होते. कुणी गप्पा टप्पा करत तर कुणी भजन म्हणत, काही तर मौन पाळत भक्तिभावाने निघाले. नजर जाईल तिथपर्यंत भक्तसागर दिसला.अर्धे भाविक अनवाणीच्अर्ध्यापेक्षा जास्त भक्त अनवाणी पायाने चालत होते. जमीन भरपूर तापलेली पण थंड वारा मन उल्हासित करत होता. डोक्यामध्ये साईचरणाचेच विचारचक्र चालू झाले होते.च्सारे जण सार्इंच्या दर्शनासाठी आतूर झाले होते. रस्त्यात ठिकठिकाणी खिचडी, पोहे, आईस्क्रीम, उसाचा रस, पाणी वाटप केले जात होते.