शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

हायफाय लग्नात पाहुणे म्हणून वावर, संधी साधत ३६ लाखांचे दागिने घेऊन फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2021 6:40 PM

Crime In Aurangabad : चोरटे दोन किंवा तीन असून ते दागिने असलेली बॅग घेऊन कारने पसार झाल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून दिसून येत आहे.

औरंगाबाद: हळदीच्या सांस्कृतीक कार्यक्रमातून चोरट्यांनी ३६ लाख ५० हजारांच्या दागिन्यांवर हात साफ केल्याची घटना सोमवारी रात्री ९.३० वाजेच्या दरम्यान बीडबायपासवरील सूर्यालॉन्स येथे घडली. चोरटे दोन किंवा तीन असून ते दागिने असलेली बॅग घेऊन कारने पसार झाल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून दिसून येत आहे. 

या प्रकरणी मंगळवारी पहाटे चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक देविदास गात यांनी दिलेली माहिती अशी की, नागपूर येथील सुनिल जैस्वाल कुटुंबातील विवाह समारंभा सूर्यालॉन्स येथे आला होता. सोमवारी रात्री हळदीचा कार्यक्रम असल्याने केवळ २५ टक्के पाहुणे उपस्थितीत होते. हळदीपूर्व फक्त सोन्याचा हार पिशवीतून काढून त्यांनी सुनेला दाखविला आणि पिशवी तेथे बाजूला ठेवून दिली. कार्यक्रम सुरू असताना कुणाचेही लक्ष नव्हते. परंतु साडेनऊच्या सुमारास पिशवी दिसत नसल्याचे जैस्वाल यांच्या निदर्शनास आले. तेव्हा सीसीटीव्ही फुटेज तपासणी, हॉलमध्ये सर्वत्र शोधाशोध सुरू झाली.

सीसीटीव्हीमध्ये लहान मुलगा दिसला चोरी करणारे दोघेतिघे असण्याची शक्यता आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक लहान मुलगा सोन्याचे दागिने असलेली पिशवी घेऊन पळताना दिसतो. त्याच्या पाठोपाठ दोघेही येथून निघून जातात. त्यानंतर एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून चोरटे लॉन्सच्या बाहेर जाताना दिसत आहेत. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ए.के. रगडे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद