शहरं
Join us  
Trending Stories
1
“लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या”; राऊतांचे CM फडणवीसांना आवाहन, प्रकरण काय?
2
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”
3
CM फडणवीसांकडून क्लीन चिट मिळताच योगेश कदमांनी मन मोकळे केले, भली मोठी पोस्ट लिहीत म्हणाले...
4
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
5
सोने-चांदी नव्हे, या धातूने दिले सर्वाधिक रिटर्न; डोळे विस्फारतील, धक्का बसेल... पण खरे आहे... 
6
"सोना कितना सोना है...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान करवाचौथला गोविंदाने बायकोला दिला सोन्याचा हार
7
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
8
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
9
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
10
इक्विटी फंड गुंतवणुकीला ब्रेक; या ईटीएफमध्ये पैसा ओततायत लोक, तुम्ही...
11
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
12
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
13
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
14
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
15
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
16
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
17
‘अर‌-ट्टाय’ काय आहे? ते व्हॉट्सॲपला पर्याय ठरेल? 
18
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
19
घुंगट, बुरखाधारी महिला मतदारांची पटवणार ओळख; बिहार निवडणुकीत घेणार अंगणवाडी सेविकांची मदत
20
दहशतवादासाठी आमची भूमी वापरू देणार नाही; अफगाणिस्तानचे भारताला आश्वासन

महावितरणचा ‘फ्रँचायजी’चा प्रयोग तूर्त टळला; दूरगामी नियोजनाचे संचालकांकडून सादरीकरण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 13:47 IST

राज्यभरातील शहरे व ग्रामीण भागात वीजपुरवठा सुरळीत करणे, खंडित करणे, दुरुस्ती, बिलाची वसुली, मीटर रीडिंग, वीजचोरी रोखणे आदी कामांचे दूरगामी नियोजन करण्यात आल्याचे वीज कर्मचारी संघटनांच्या बैठकीत महावितरणचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार यांनी दिले. त्यामुळे औरंगाबाद व जळगाव शहरातील वीजपुरवठ्याचे काम खाजगी संस्थेकडे (फ्रँचायजी) देण्याच्या हालचाली तूर्तास टळल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

ठळक मुद्देमहावितरण कंपनीतील प्रमुख सहा कर्मचारी संघटनांच्या कृती समितीसमोर मुख्य व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार कर्मचार्‍यांकडे सोपविण्यात येणार्‍या जबाबदारीचे सादरीकरण केले. येत्या १ एप्रिलपासून महावितरणच्या संचलन व सुव्यवस्थेसाठी स्वतंत्र तीन विभाग अस्तित्वात येणार आहेत. कर्मचार्‍यांची कपात न करता आहे त्या कर्मचार्‍यांची विभागणी तीन विभागांत केली जाणार आहे.

औरंगाबाद : राज्यभरातील शहरे व ग्रामीण भागात वीजपुरवठा सुरळीत करणे, खंडित करणे, दुरुस्ती, बिलाची वसुली, मीटर रीडिंग, वीजचोरी रोखणे आदी कामांचे दूरगामी नियोजन करण्यात आल्याचे वीज कर्मचारी संघटनांच्या बैठकीत महावितरणचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार यांनी दिले. त्यामुळे औरंगाबाद व जळगाव शहरातील वीजपुरवठ्याचे काम खाजगी संस्थेकडे (फ्रँचायजी) देण्याच्या हालचाली तूर्तास टळल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

महावितरण कंपनीतील प्रमुख सहा कर्मचारी संघटनांच्या कृती समितीसमोर मुख्य व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार कर्मचार्‍यांकडे सोपविण्यात येणार्‍या जबाबदारीचे सादरीकरण केले. येत्या १ एप्रिलपासून महावितरणच्या संचलन व सुव्यवस्थेसाठी स्वतंत्र तीन विभाग अस्तित्वात येणार आहेत. कर्मचार्‍यांची कपात न करता आहे त्या कर्मचार्‍यांची विभागणी तीन विभागांत केली जाणार आहे. सुपरवायझर केडरमधील कर्मचारी प्रत्यक्षात फिल्डवरील कामासाठी नियुक्त केले जातील. वीज ग्राहकांना दरमहा बिलासंबंधीचा संदेश मोबाईलवरच दिला जाईल. यापुढे एप्रिलपासून तांत्रिक कामगार ज्या विभागात कार्यरत असतील त्यांच्यावर त्याच कामांची जबाबदारी राहील. शहरी व निमशहरी भागात विद्युत पुरवठ्यासंबंधीची दुरुस्ती, दुरुस्तीसाठी विद्युत पुरवठा बंद ठेवणे, बिल न भरणार्‍या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करणे, बिल भरल्यास पुन्हा वीज जोडणे आदी कामांसाठी स्वतंत्र पथके कार्यरत केली जातील. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर ग्रामीण भागात त्याची अंमलबजावणी केली जाईल.

भविष्यात मीटर प्रयोगशाळा अस्तित्वात आणण्याचा महावितरणचा मानस आहे. १ एप्रिलपासून सहायक अभियंता हे बिलिंग विभागाचे प्रमुख असतील. त्यांच्यावरच यापुढे ग्राहकांच्या बिलासंबंधीच्या तक्रारी, मीटर रीडिंग, वीज चोरीचे बिल, थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची जबाबदारी असेल. ग्रामीण उपविभागात बिलिंग व महसूलसाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत केली जाणार आहे. बहुतेक सर्वच कामे आॅनलाईन होतील. त्यामुळे प्रचलित टिपणी लिहिण्याची कामे इतिहासजमा होतील. 

तांत्रिक कामगार समाधानीमहावितरणने तब्बल ५७ वर्षांनंतर कर्मचार्‍यांच्या कामाची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला असून, तांत्रिक कामगारांवरील मोठा ताण यामुळे कमी होणार आहे. महावितरणच्या कार्यपद्धतीची पुनर्रचना राज्यातील १६ झोन, ४४ सर्कल, १४० विभाग, ६६३ उपविभाग व ३२२८ शाखा कार्यालयांमध्ये होणार आहे. महावितरणच्या या निर्णयामुळे तांत्रिक कामगार संघटनेचे अध्यक्ष एन. के. मगर, सरचिटणीस सय्यद जहिरोद्दीन, भाऊसाहेब भाकरे, टी. डी. कोल्हे, आर. पी. थोरात आदींनी समाधान व्यक्त केले आहे. 

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणAurangabadऔरंगाबाद