शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

बीएस-६ डिझेल वाहनांत इंधनासह लिक्विड युरियाचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 11:49 PM

आरटीओ : बीएस-४ वाहने नोंदणीसाठी ३१ मार्चची ‘डेडलाईन'

ठळक मुद्देप्रदूषण कमी करण्यावर भर

औरंगाबाद :  आरटीओ कार्यालयात १ एप्रिलपासून बीएस-४ वाहनांची कोणत्याप्रकारे नोंदणी केली जाणार नाही. अशा वाहनांची वाहनमालकांनी ३१ मार्चपूर्वी  नोंदणी करून नंबर घ्यावा लागेल. त्याबरोबरच बीएस-६ डिझेल वाहनांमध्ये डिझेलसह प्रदूषण कमी होण्यासाठी युरिया लिक्विड टाकावे लागणार आहे, अशी माहिती गुरुवारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी सहायक परिवहन अधिकारी रमेशचंद्र खराडे यांची उपस्थिती होती. सर्वाेच्च न्यायालयाने देशभरात १ एप्रिलनंतर बीएस-६ मानांकन नसलेली वाहने विक्री व नोंदणी करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे बीएस-४ वाहन खरेदी केल्यानंतर त्याची ३१ मार्चपूर्वी नोंदणी होऊन क्रमांक जारी होणे आवश्यक आहे. सध्या बाजारात बीएस- ४ ची वाहनांची संख्या कमी आहे. वाणिज्यिक वाहने आणि दुचाकी वाहने काही प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध असाव्यात अशी शंका आहे. बीएस-४ वाहनांची नोंदणी होण्यासाठी ३१ मार्चपर्यंत सुटीच्या दिवशी म्हणजे शनिवार, रविवारी कार्यालय सुरु राहणार असल्याचे मेत्रेवार यांनी सांगितले. सध्या ९० टक्के वाहने बीएस-६ ची आलेली असल्याचे खराडे यांनी सांगितले. 

या वाहनांना सवलतबीएस ४ च्या निर्णयातून बीएस-३ मानांकन असलेल्या ट्रॅक्टर आणि बांधकामासाठी वापरण्यात येणाºया वाहनांना सुट देण्यात आली आहे. या वाहनांची विक्री ३० सप्टेंबर २०२० पर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर यात बीएस-४ वाहने येतील, असे आरटीओ अधिकाºयांनी सांगितले.

१०० लिटरला लागेल ५ लिटर लिक्विडबीएस-६ डिझेल वाहनांना १०० लिटर इंधनासाठी ५ लिटर युरिया लिक्विड टाकावे लागेल. यासाठी वेगळी टाकी राहिल. यामुळे सायलन्सरमधून निघणारा धूर फिल्टर होण्यास मदत होईल. पेट्रोल पंपांवर जवळपास ४० ते ५० रुपये लिटर या दराने लिक्विड उपलब्ध होईल, असे संजय मेत्रेवार यांनी सांगितले. 

टॅग्स :pollutionप्रदूषणAurangabadऔरंगाबाद