शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

उर्दू भाषिक वकील;मराठीचे करी संवर्धन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 14:14 IST

मराठीतून लिहिली कायदेविषयक पुस्तके

ठळक मुद्देइंग्रजी भाषेतील पुस्तकांचा मराठीतून अनुवाद 

- स. सो. खंडाळकर  

औरंगाबाद : उर्दू भाषिक असूनही शहरातील एका वकिलाने मराठीत एकूण चौदा पुस्तके लिहून मराठीच्या संवर्धनासाठी मोठा हातभार लावला आहे. अ‍ॅड. नवाब पटेल असे या वकिलाचे नाव असून, मराठीबरोबरच त्यांनी उर्दूतून अनेक पुस्तके प्रकाशित केली आहेत. 

अ‍ॅड. नवाब पटेल हे मूळचे उर्दू भाषिक. त्यांचे चौथीपर्यंतचे शिक्षण उर्दू भाषेत झाले. दहावीपर्यंतचे शिक्षण मात्र मराठी माध्यमातून झाले. पदवी व पदव्युत्तर शिक्षण इंग्रजी भाषेत झाले. अ‍ॅड. पटेल यांनी  बी.ए.एलएल.बी., बीजे, एम.एम.सीजे. केले आहे.  मराठी भाषेतून पुस्तक लिहिण्यामागील उद्देशाबद्दल सांगताना पटेल म्हणाले, देशातून इंग्रजी राजवट गेली. पण देशात सर्व कायदे इंग्रजी भाषेत केले जातात. दुसरीकडे इंग्रजी सर्वांना येतेच असे नाही. बहुतांश मंडळी इंग्रजी वाचू- लिहू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. म्हणून जनतेला कायद्याच्या ज्ञानापासून वंचित राहावे लागते. याचा विचार करून इंग्रजी भाषेतील पुस्तकांचा मराठी अनुवाद अगदी साध्या, सोप्या व सरळ भाषेत केला आहे. एका अर्थाने माझ्या हातून मराठीच्या संवर्धनाचेच कार्य घडले आहे, असे म्हटल्यास ते अतिशयोक्तीपूर्ण ठरू नये. 

कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा-२००५, लोकपाल व लोकायुक्त कायदा-२०१३, वक्फ कायदा २००५, सन २०१३ च्या सुधारणेसह, वक्फ नियम २००५ सन २०१४ च्या नियमांसह, मुस्लिम वारसा हक्क कायदा, कायदेशीर तलाख, शरियत कायद्याच्या तरतुदीसह, बालविवाह प्रतिबंध कायदा-२००६, अनुसूचित जाती जनजाती अत्याचार प्रतिबंधक कायदा-१९८९, स्त्रियांचे असभ्य प्रतिरुपन विरोधी कायदा १९८६, लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम -२०१२, कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक शोषण प्रतिबंध कायदा-२०१३, भारतीय पारपत्र अधिनियम-१९६७, मानसिक आरोग्य अधिनियम १९८७, अल्संख्याक समाजाच्या व्यक्तींसाठी राज्यघटना व फौजदारी  कायद्यामधील विशेष तरतुदी, ही अ‍ॅड. नवाब पटेल यांची मराठी भाषेतून लिहिलेली अत्यंत उपयुक्त अशी पुस्तके आहेत. 

महत्वाची पुस्तके केली प्रकाशित मूळचे उर्दू भाषिक असलेल्या नवाब पटेल यांनी सर्वसामान्य मुस्लिम बंधू-भगिनींसाठी उर्दू भाषेतही महत्त्वाच्या विषयांवरील पुस्तके प्रकाशित केली आहेत. ती अशी : वक्फ कानून २००५, कानून बराए विरासत, घरेलू तशददूदसे खवातिन की हिफाजत कानून-२००५, चेक बाऊन्स हुआ तो क्या करे, वक्फ नियम २००५, या त्यांच्या पुस्तकांनाही चांगली मागणी आहे. अ‍ॅड. नवाब पटेल हे पत्रकारितेचे पदव्युत्तर असल्याने ‘असा गेला आठवडा’ हे मराठीतील साप्ताहिकही चालवतात. मराठीच्या संवर्धनासाठी ते करीत असलेल्या कार्याची दखल घेऊन तत्कालीन राज्यपाल डॉ. पी. सी. अलेक्झांडर यांच्या हस्ते पटेल पती-पत्नीचा सत्कारही करण्यात आला होता.

टॅग्स :marathiमराठीliteratureसाहित्यAurangabadऔरंगाबाद