शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाच्या जिल्हानिहाय युवक महोत्सवाचे वेळापत्रक जाहीर; केंद्रीय महोत्सव कधी, कुठे होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 15:42 IST

गणेश उत्सव झाल्यानंतर ८ ते ३० सप्टेंबर या काळात महोत्सवाचे आयोजन

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा युवक महोत्सव यंदापासून जिल्हानिहाय होणार आहे. गणेश उत्सव झाल्यानंतर ८ ते ३० सप्टेंबर या काळात महोत्सवाचे आयोजन केले असून, यजमान पदासाठी प्रत्येक जिल्ह्यातील एक महाविद्यालय निवडण्यात आले असल्याची माहिती विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. कैलास अंभुरे यांनी दिली.

युवक महोत्सवाच्या तयारीसाठी कुलगुरु डॉ. विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीत महोत्सव आयोजन करण्याबाबत विस्तृतपणे चर्चा झाली. त्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड व धाराशिव या चारही जिल्ह्यांत युवक महोत्सवाचे आयोजन केल्यानंतर लगेच ‘ केंद्रीय युवक महोत्सव ’ घेण्याचा निर्णय घेण्यात आला. गुणानुक्रमे पहिले तीन संघ केंद्रीय महोत्सवात सहभागी होतील. जिल्हा महोत्सव संलग्नित महाविद्यालयात तर केंद्रीय महोत्सव विद्यापीठाच्या छत्रपती संभाजीनगर या मुख्य कॅम्पसमध्ये घेण्यात येणार आहे. युवक महोत्सवासाठी संपूर्ण नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन ठेवली असल्याचेही डॉ. अंभुरे यांनी सांगितले. तसेच महोत्सवात एकूण ५ गटात २८ कलाप्रकार सादर होणार आहेत. तसेच शोभायात्रा हा स्वतंत्र कलाप्रकारही असणार आहे.

असे असणार जिल्हानिहाय वेळापत्रकधाराशिव जिल्ह्यातील महोत्सव जवाहर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अणदूर येथे ८ व ९ सप्टेंबर दरम्यान होईल. त्यानंतर बीड जिल्ह्यात र.ब. अट्टल महाविद्यालय, गेवराई येथे ११ व १२ सप्टेंबर, जालना जिल्ह्यात मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे वरिष्ठ महाविद्यालय, अंबड येथे १५ व १६ सप्टेंबर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महाविद्यालयांचा महोत्सव देवगिरी महाविद्यालयात १९ ते २१ सप्टेंबर दरम्यान होणार आहे. यावेळी संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य व सांस्कृतिक प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये प्राचार्य डॉ. अशोक तेजनकर, डॉ. गणेश मोहिते, प्राचार्य डॉ. मिलिंद पंडित, डॉ. विनोद जाधव, प्राचार्य डॉ. रजनी शिखरे, डॉ. समाधान इंगळे, प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी व डॉ. अंकुश कदम यांची यावेळी उपस्थिती होती.

केंद्रीय महोत्सव विद्यापीठ परिसरातया चारही जिल्ह्यांचे महोत्सव संपल्यानंतर २७ ते ३० सप्टेंबर या काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य परिसरात केंद्रीय युवक महोत्सव घेण्यात येणार आहे. सल्लागार समिती, संयोजन समिती, जिल्हा समन्वयक व विद्यार्थी विकास विभागाचे कर्मचारी महोत्सवासाठी परिश्रम घेत असल्याचेही संचालक डॉ. अंभुरे यांनी सांगितले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्रchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर