शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
5
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
6
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
7
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
8
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
9
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
10
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
11
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
12
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
13
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
14
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
15
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
16
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
17
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

विद्यापीठाने महापालिकेला धरले जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2019 11:06 PM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थिनी वसतिगृहात दूषित पाणीपुरवठ्यामुळे १६६ विद्यार्थिनींना उलट्या, मळमळ, जुलाबचा त्रास झाला होता. या प्रकरणात विद्यापीठाच्या कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी महापालिकेकडून मिळालेले पाणी पिण्याच्या टाक्यात टाकले होते, असे म्हणत मनपाला जबाबदार धरले आहे. तसेच यातील दोषी व्यक्तींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न विद्यापीठ प्रशासनाकडून सुरू असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले.

ठळक मुद्देदूषित पाणीपुरवठा प्रकरण : पाण्याच्या टाकीत मनपाचेच पाणी टाकले

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थिनी वसतिगृहात दूषित पाणीपुरवठ्यामुळे १६६ विद्यार्थिनींना उलट्या, मळमळ, जुलाबचा त्रास झाला होता. या प्रकरणात विद्यापीठाच्या कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी महापालिकेकडून मिळालेले पाणी पिण्याच्या टाक्यात टाकले होते, असे म्हणत मनपाला जबाबदार धरले आहे. तसेच यातील दोषी व्यक्तींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न विद्यापीठ प्रशासनाकडून सुरू असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले.विद्यापीठातील विद्यार्थिनी वसतिगृहात मागील आठवड्यात पिण्याच्या पाण्यात दूषित पाणी मिसळल्यामुळे विद्यार्थिनींना ऐन परीक्षेच्या काळात दवाखान्यात दाखल व्हावे लागले. या प्रकाराकडे सुरुवातीला दुर्लक्ष करणाऱ्या विद्यापीठ प्रशासनाला आजारी विद्यार्थिनींची संख्या वाढत गेल्याने लक्ष द्यावे लागले. मागील आठवड्यात सोमवारी (दि.२९ एप्रिल) कुलसचिवांनी एक दिवसाच्या आत पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी देण्यात येतील. घडलेल्या गंभीर प्रकाराची चौकशी तात्काळ केली जाईल, असे स्पष्ट केले होते. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही केली नाही. व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. राजेश करपे, किशोर शितोळे, अधिसभा सदस्य डॉ. राम चव्हाण, डॉ. स्मिता अवचार, डॉ. लक्ष्मीकांत शिंदे, डॉ. योगिता होके-पाटील यांनी वसतिगृहातील विद्यार्थिनींची भेट घेतल्यानंतर प्रशासनाला धारेवर धरले. विद्यार्थी संघटनांनी मोठ्या प्रमाणात आंदोलने केली. यानंतर वसतिगृहातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला. यात दोषींवर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली. तेव्हा प्रकरण दाबण्यासाठी काही विद्यार्थी संघटना, प्रशासनातील अधिकारी आणि व्यवस्थापन परिषद सदस्याने पडद्याआड प्रयत्न सुरू केले. त्यात त्यांना यश आल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. दौºयावरून परतलेले कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांची भेट घेतली असता, त्यांनी या प्रकरणाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारवाई करता येईल, असे उत्तर दिले. यावेळी उपस्थित प्रभारी कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी विद्यार्थिनी वसतिगृहात महापालिकेकडून मिळणारे पाणीच टाकले. त्याशिवाय इतर कोणत्याही ठिकाणचे पाणी टाकले नसल्याचे स्पष्ट करून महापालिकेकडे बोट दाखविले आहे.कुलसचिवांना पाठीशी घालण्याचा प्रयत्नविद्यापीठातील विद्यार्थिनी वसतिगृहात घडलेल्या प्रकारानंतर हे प्रकरण योग्यपणे हाताळण्यात आले नाही. त्यामुळे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, विद्यार्थी संघटनांनी प्रभारी कुलसचिव डॉ. साधना पांडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. याविषयीचे निवेदनही कुलगुरूंना देण्यात आले. मात्र डॉ. पांडे यांना पाठीशी घालण्यासाठी एक व्यवस्थापन परिषद सदस्य, विद्यापीठातील अधिकारी आणि एका गटातील काही पदाधिकारी यांनी मोहीम राबविली असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे दूषित पाणीपुरवठा प्रकरणात कोणावरीही कारवाई होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.विद्यापीठाचे प्रकुलगुरू, कुलसचिव, मालमत्ता विभागाचे अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांची सोमवारी बैठक घेतली. या बैठकीत पाणीपुरवठ्यासह इतर सर्व बाबींचा आढावा घेतला. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून, ९० हजार लिटर पाण्याचा साठा तयार ठेवला आहे. पाणीपुरवठा सुरळीत होईल, याची दक्षता घेतली जात आहे. तसेच आजारी पडलेल्या विद्यार्थ्यांचा रुग्णालयात झालेला खर्चही देण्यात येईल.- डॉ. बी. ए. चोपडे, कुलगुरू------------

टॅग्स :Educationशिक्षणuniversityविद्यापीठHealthआरोग्य